AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर प्रत्येक जिल्ह्यात गुन्हे दाखल करू; अरुण राठोडच्या गावातील गावकऱ्यांचा इशारा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं आहे. (beed villagers reaction on Pooja Chavan Suicide Case)

... तर प्रत्येक जिल्ह्यात गुन्हे दाखल करू; अरुण राठोडच्या गावातील गावकऱ्यांचा इशारा
| Updated on: Feb 14, 2021 | 1:47 PM
Share

बीड: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं आहे. संजय राठोड यांचे कार्यकर्ते अरुण राठोड याचं नावही या प्रकरणात आलं आहे. मात्र, या प्रकरणामुळे बंजारा समाजाची बदनामी होत असल्याचं सांगत बंजारा नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अरुणच्या गावातील ग्रामस्थांनी तर समजाची बदनामी करणाऱ्यांविरोधात प्रत्येक जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. (beed villagers reaction on Pooja Chavan Suicide Case)

अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण प्रकरणात त्याचं नाव आल्यापासून त्याच्या गावातील लोक संतप्त झाले आहेत. अरुण हा अत्यंत साधा मुलगा आहे. तो पदवीधर आहे. शिक्षण आणि घर हेच त्याचं जग आहे. असं असताना त्याच्यावर आरोप करून समजालाही बदनाम केलं जात असून आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा या ग्रामस्थांनी दिला. काही लोकांनी समाजाची बदनामी सुरू केली आहे. त्यामुळे बीड, यवतमाळ, औरंगाबाद, जालना आणि राज्यातील इतर भागात उद्यापासून आंदोलनं करण्यात येणार असल्याचंही या ग्रामस्थांनी सांगितलं. राठोडगिरी असे शब्द वापरून समाजाला बदनाम न करण्याचं आवाहनही या ग्रामस्थांनी केलं.

क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचा नाही

धारावती तांड्यातील गावकऱ्यांनी क्लिपमधील संजय राठोड आणि अरुण राठोड यांच्या आवाजाबाबत शंका उपस्थित केली आहे. हा आमच्या नेत्याचा आवाजच नाही, असं या गावकऱ्याचं म्हणणं आहे. तर आमच्या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून ही बदनामी आम्ही खपवून घेणार नाही, असं या गावकऱ्यांनी सांगितलं.

सखोल चौकशी करा

गावातील महिलांनीही या प्रकरणावर त्यांचं मत मांडलं. पूजा आमच्या समाजाची आहे. तिच्यावर अन्याय होऊ नये. ऑडिओ क्लिपची कसून चौकशी करा. समजाला बदनाम करू नका. आमचा कायद्यावर विश्वास आहे. पुरावा असेल तरच बोला. पुराव्याशिवाय कुणीही समाजाची बदनामी करू नये, असं या महिलांचं म्हणणं आहे. संजय राठोड हे आमच्या समाजाचे नेते आहेत. आमच्याकडे तेवढाच नेता आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमची कळकळ आहे, असंही या महिलांनी सांगितलं.

अरुणचे आईवडील गरीब

पूजा आणि अरुणचा संपर्क शिक्षणामुळे आला असेल. पूजा वसंत नगरमध्ये राहते. दारावती तांड्यापासून वसंत नगर सात-आठ किलोमीटरवर आहे. परळीत कॉलेज असल्याने शिक्षणाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली असेल, असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अरुणचे आई-वडील शेतकरी आहेत. शेती करतात आणि ऊसतोडीचं काम करतात. ते गरीब आणि मजूर आहेत, असं सांगितलं. (beed villagers reaction on Pooja Chavan Suicide Case)

संबंधित बातम्या:

भाऊ, पूजा ताई र आत्महत्या छ कि घात पात हाई?; फेसबुकवर राठोडांना नेटकऱ्यांचा सवाल

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

मुख्यमंत्र्यांनी क्लिप नीट ऐकाव्या म्हणजे कळेल की कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय: देवेंद्र फडणवीस

(beed villagers reaction on Pooja Chavan Suicide Case)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.