AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड जिल्हा वार्षिक योजना आराखड्यात 71 कोटींची वाढ; आता मिळणार 360 कोटी रुपये

बीड जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणच्या सन 2022-23 च्या 288.68 कोटी रुपयांच्या आराखड्यात तब्बल 71 कोटी 31 लाख 50 हजार रुपयांची वाढ करत ही रक्कम 360 कोटी रुपये इतकी वाढविण्यात आल्याची घोषणा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केली आहे. अजित  पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बीड जिल्हा वार्षिक नियोजनाच्या  विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बीड जिल्हा वार्षिक योजना आराखड्यात 71 कोटींची वाढ; आता मिळणार 360 कोटी रुपये
अजित पवार
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 9:03 PM
Share

मुंबई : बीड जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणच्या सन 2022-23 च्या 288.68 कोटी रुपयांच्या आराखड्यात तब्बल 71 कोटी 31 लाख 50 हजार रुपयांची वाढ करत ही रक्कम 360 कोटी रुपये इतकी वाढविण्यात आल्याची घोषणा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. अजित  पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बीड जिल्हा (Beed District) वार्षिक नियोजनाच्या  विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  उपस्थित होते. तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी सर्वसाधारणच्या 288.68 कोटींच्या आराखड्यात वाढ करून दिली जावी अशी, आग्रही मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली असता, त्यास सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसाधारणच्या आराखड्यासाठी 288.68 कोटींवरून वाढवत 360 कोटी देण्यास  मान्यता दिली.

अखर्चित निधी खर्च करण्याचे आदेश

दरम्यान मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीस देण्यात आलेल्या 340 कोटी रुपयांपैकी अखर्चित असलेल्या निधी 100% खर्च करण्याचे नियोजन 15 फेब्रुवारीच्या आत करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी अजित पवारांकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले रस्ते, पूल यांसह अन्य सार्वजनिक मालमत्ता दुरुस्तीसाठी बीड जिल्ह्यास अतिरिक्त निधी देण्यात यावा, मातोश्री पांदण रस्त्यांच्या योजनेस मान्यता, जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगड, श्री क्षेत्र गहिणींनाथगड तसेच पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड व परळी वैद्यनाथ देवस्थान व जिल्ह्यातील अन्य महत्वाच्या तीर्थ स्थळांच्या विकास आराखड्यास अर्थ व नियोजन विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीकडे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधले असता, या सर्व विषयांसाठी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही देखील यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.

अतिवृष्टीमुळे बाधित रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची शक्य असलेली सर्व कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केली जावीत, तसेच या व्यतिरिक्त निधीची मागणी नियोजन विभागास सादर करावी असेही यावेळी पवारांनी सांगितले.  कोविड काळात बीड जिल्ह्यात उपाययोजना व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला. जिल्ह्यात आणखी आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी आणखी निधीची गरज असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान  माजलगाव व आष्टी येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यास तसेच जिल्ह्यातील अन्य आवश्यक असलेल्या ग्रामीण रुग्णालयांची दुरुस्ती व नाविनिकरण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून स्वतंत्र तरतूद करून देण्यात येईल, असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

पुण्यात अजित पवार VS चंद्रकांत पाटील, अजित पवारांवर आरोप करत पाटील म्हणतात…

VIDEO: सव्वा दोन वर्षात मंत्रालयाकडे फिरकले नाहीत, कोणत्या निकषावर मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले?: चंद्रकांतदादा

Utpal Parrikar: माझ्या मनात रोजच भाजप, पक्षाने मला सोडलं का हे त्यांनाच विचारा; उत्पल पर्रिकरांकडून चेंडू भाजपच्या कोर्टात

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.