पुण्यात अजित पवार VS चंद्रकांत पाटील, अजित पवारांवर आरोप करत पाटील म्हणतात…

पुण्यात अजित पवार VS चंद्रकांत पाटील, अजित पवारांवर आरोप करत पाटील म्हणतात...
अजित पवार, चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील राजकीय वाद वाढताना दिसून येतोय, या वादाला यावेळी कारण ठरलंय पुण्यातल्या शाळा आणि कोरोना आढावा बैठक.

योगेश बोरसे

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 21, 2022 | 8:31 PM

पुणे : जसजशी पुणे महापालिकेची निवडणूक (Pune municipal corporation Election) जवळ येतील तसतसा चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील राजकीय वाद वाढताना दिसून येतोय, या वादाला यावेळी कारण ठरलंय पुण्यातल्या शाळा आणि कोरोना आढावा बैठक. अजित पवार बैठकीत विश्वासात घेत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. तर याला राष्ट्रवादीने त्याला प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार हे विश्वासात घेत नसून बैठकीत आम्ही केलेल्या सूचनांना कचऱ्याची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे आपण बैठकीत सहभागी होत नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

पुण्यातल्या शाळांचं काय होणार?

राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू आहे. अशातच पुण्यातल्या कोरोना रुग्णांची सख्या तर धडकी भरवणारी आहे. काल एकट्या पुणे जिल्ह्यातली कोरोना रुग्णांची सख्या पंधरा हजारांच्या जवळ गेली आहे. त्यामुळे पुण्यातल्या शाळांबाबत निर्णय हा अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर घेण्यात येणार असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय. या बैठकीला पुण्याच्या महापौरासह स्थानिक सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र चंद्रकांत पाटलांनी आता हा पवित्रा घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात अजित पवारांना पत्र पाठवणार असेही पाटील म्हणालेत. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय आरोपांना राष्ट्रवादिनेही प्रत्युत्तर दिलंय. कोरोना निर्बंधावरून चंद्रकांत पाटील आणि अजितदादा यांच्यातील राजकीय वाद हे पुणेकरांना काही नवे नाहीत. मात्र हा वाद पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी टोकाला जाणार असंच दिसतंय.

VIDEO: सव्वा दोन वर्षात मंत्रालयाकडे फिरकले नाहीत, कोणत्या निकषावर मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले?: चंद्रकांतदादा

Goa Assembly Election : पणजीतूनच अपक्ष म्हणून लढणार, उत्पल पर्रिकरांची घोषणा; उत्पल यांची एकला चलोची भूमिका भाजपला नडणार?

‘गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ, डिपॉझिट जरी वाचले तरी…’,आशिष शेलारांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें