AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकर यांनी दिलेली शिलाई मशीन ठरली जगण्याचा आधार! बीडच्या राजश्री परदेशी झाल्या स्वावलंबी, मशीन चालवतानाच धडकली निधनाची बातमी

Nana Patekar Rajshree Pardeshi: 2014-15 मध्ये दुष्काळाचे सावट असताना नाना पाटेकर यांनी मराठवाड्यासह विदर्भातील अनेक शेतकरी, महिलांना मदतीचा हात दिला. बीड जिल्ह्यातील राजश्री परदेशी यांना यामुळे स्वावलंबी होता आले.

नाना पाटेकर यांनी दिलेली शिलाई मशीन ठरली जगण्याचा आधार! बीडच्या राजश्री परदेशी झाल्या स्वावलंबी, मशीन चालवतानाच धडकली निधनाची बातमी
नाना पाटेकर यांनी दिलेली शिलाई मशीन ठरली जगण्याचा आधार!
| Updated on: Oct 09, 2026 | 2:21 PM
Share

Nana Patekar Rajshree Pardeshi: दुष्काळाची घोषणा झाली. राज्य सरकार मदत करेल तेव्हा करेल. पण प्रत्यक्ष मदत करणारी काही मंडळी अगदी बोटावर मोजण्याइतपतच असतात. त्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे एक होते. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून त्यांनी नाम फाऊंडेशन सुरू केले. 2014-15 मध्ये दुष्काळाचे सावट असताना नाना पाटेकर यांनी मराठवाड्यासह विदर्भातील अनेक कुटुंबांना आधार दिला. मदतीचा हात दिला. त्यांनी महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आर्थिक मदत दिली. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील आर्वी गावातही त्यांनी मदत केली. येथील राजश्री आसाराम परदेशी यांना नाना यांनी दिलेल्या शिलाई मशीनचा आधार मिळाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक चणचण कमी झाली. नानांच्या निधनाची बातमी धडकली तेव्हा त्या शिलाई मशीनच चालवत होत्या. त्यांनी ही बातमी कळताच गलबलून आले.

एकटीने हाकला कुटुंबाचा गाडा

राजश्री परदेशी यांच्यावर संकट कोसळले. पती रोजंदारी मजूर होते. बांधकाम करताना ते उंच ठिकाणावरून खाली पडले. ते गंभीर जखमी झाले आणि अंथरूणाला खिळले. अचानक कुटुंबाची आर्थिक जबाबदारी राजश्री यांच्या खांद्यावर येऊन पडली. अशा बिकट परिस्थितीत दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली. त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला.

नाम फाऊंडेशनची मदत

मराठवाड्यातील भीषण दुष्काळात नाना पाटेकर -मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला. राजश्री यांची बिकट परिस्थिती पाहून 10 वर्षांपूर्वी राजश्री यांना एक शिलाई मशीन देण्यात आली होती. या मशीनने राजश्री यांच्या आयुष्यात आशेचा किरण उगवला. त्यांना एक नवीन दिशा मिळाली. त्यांनी गावातच कपडे शिलाईचे काम सुरू केले. त्यातून दिवसाला त्या 300 ते 500 रुपयांची कमाई करतात. महिन्याला त्यांना 10 ते 12 हजारांची कमाई होते. या शिलाई मशीनमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा हातभार लागला आहे.

शिलाई काम सुरू असतानाच नानांच्या निधनाचे वृत्त

काल नाना पाटेकर यांचे पहाटे निधन झाले. सकाळची कामं उरकून राजश्री या शिलाई मशीनवर कपडे शिवत होत्या. त्याचवेळी त्यांना नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी कळली. आपल्या कुटुंबाला आधार देणारा एक चांगला माणूस जगातून निघून गेल्याचे समजताच त्यांचा कंठ दाटला. त्यांना गलबलून आले. आमच्या उदध्वस्त आयु्ष्याला आणि घराला ही शिलाई मशीन देऊन ज्यांनी सावरलं, ती व्यक्ती आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी किसान तक ला दिली.

Follow Us
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी