AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवारांचा कायमच…; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

Jayant Patil on Sharad Pawar and Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी महत्वाचं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील दौरा करत आहेत. यावेळी बीडमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलताना महत्वाचं विधान केलं आहे. वाचा...

भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवारांचा कायमच...; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
जयंत पाटील
| Updated on: May 09, 2024 | 6:41 PM
Share

शरद पवार भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा करत होते, असं अजित पवारांनी वारंवार सांगितलं आहे. तशा बैठका झाल्याचंही ते म्हणालेत. यावर राज्याच्या राजकारणात वारंवार चर्चा होत असते. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांचा भाजपसोबत जाण्याला कायम विरोध राहिला आहे. देशातील अनेक लहान पक्ष भाजपला विरोध करत आहेत. तामिळनाडू, आंध्रप्रदेशात भाजपला विरोध आहे. त्यामुळे पवार साहेबांनी अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. असं वक्तव्य केलं होतं, असं जयंत पाटील म्हणाले.

बारामतीतील लढतीवर भाष्य

बारामतीत मतदान झालं आहे. कोण निवडून येईल हे चार तारखेलाच समजेल. मी रोहित पवारांची भाषणं ऐकली नाहीत. मात्र त्यांचा तोल गेलाय अशी भाषणे माझ्या ऐकण्यात आली नाही. शरद पवार साहेबांच्या विरोधात मोदी देखील टोकाची भाषा वापरत होते. भटकती आत्मा असं वक्तव्य मोदी यांच्याकडून करण्यात आलं. चंद्रकांत दादा, फडणवीस मोदी हे जेंव्हा पवार साहेबांवर टीका करतात तेंव्हा त्यांची टीका सहन करण्याशिवाय काहीही पर्याय नाही, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

ते लोकांना पटत नाही- जयंत पाटील

नरेंद्र मोदींना संविधान बदलायचं आहे, असा भारताचा समज आता पक्का झाला आहे. भाजपचा जनाधार पूर्णपणे केला आहे, त्यामुळे असे वक्तव्य करत आहेत. ते बोलतील तेच करतील असं याआधी कधी झाले नाही. महाराष्ट्रात येऊन ते पवार साहेबांच्या विरोधात बोलतात. हे लोकांना पटत नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.

पंकजा मुंडे यांची ऑडियो क्लिप मी ऐकली आहे. प्रलोभन दाखवत नाहीत तर आणखीन बरच काही त्या बोलल्या आहे. हे आचासंहितेत प्रलोभन दाखविणे योग्य नाही. नरेंद्र मोदींनी बजरंग सोनावणे यांना पडण्यासाठी सभा घेतली. यातच सोनावणे यांचा विजय आहे. मी माझ्या पक्षाचं पाहतो. दुसरा पक्ष कोणता उमेदवार कुठे देईल मला माहीत नाही. बीडमधला वाद हा मराठा ओबीसी नाही, पुढाऱ्यांचा आहे, असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....