AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड: नगरपरिषदेतील ठरावावरून माजलगावचे राजकारण पेटले, आजी-माजी नगराध्यक्ष आमनेसामने

येत्या काही दिवसात माजलगाव नागरपरिषदेची निवडून होऊ घातलीय, त्याच धर्तीवर भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्वाची नागरपरिषद म्हणून माजलगावकडे पाहिले जात असले तरी आरोप- प्रत्यारोपातून माजलगावचे राजकारण सध्या तरी पेटले आहे.

बीड: नगरपरिषदेतील ठरावावरून माजलगावचे राजकारण पेटले, आजी-माजी नगराध्यक्ष आमनेसामने
| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 1:31 PM
Share

बीडः  निवडणुका तोंडावर आल्यानंतर राजकीय पुढारी आणि प्रशासकात नेहमीच वाद होतात. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्येही (Majangaon Nagar Parishad) असाच वाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष मंजूर शेख यांनी बनावट ठराव घेऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस (Sahal Chaus) यांनी केला आहे. माजलगावचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष मंजूर शेख (Manjur Shaikh) यांनी बोगस ठराव घेऊन लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपावरून जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. याप्रकरणी भाजपचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे. दरम्यान टेंडर मंजूर झालेच नाही त्यामुळे भ्रष्टाचार झाला कुठून असा प्रतिसवाल नगराध्यक्ष मंजूर शेख यांनी केलाय. त्यामुळे माजलगावचे राजकारण पेटले आहे.

नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचा आरोप

Majalgaon tender

राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष मंजूर शेख यांनी बनावट ठराव घेऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. एवढेच नाही तर अधिकाऱ्यांची तक्रार करून थेट पैसे मागतात असा गंभीर आरोप चाऊस यांनी केलाय..

सहाल चाऊस यांचे आरोप बिनबुडाचे- चाऊस

मात्र माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी केलेल्या आरोपाचे नगराध्यक्ष मंजूर शेख यांनी खंडन केले आहे. मी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही उलट माजलगावच्या नागरी सुविधा पुरविण्याचे काम केले आहे मात्र भाजप चे माजी नगराध्यक्ष यांनी प्रशासकाला हाताशी धरून बिनबुडाचे राजकारण करीत असल्याचा प्रत्यारोप मंजूर शेख यांनी केलाय.

येत्या काही दिवसात माजलगाव नागरपरिषदेची निवडून होऊ घातलीय, त्याच धर्तीवर भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्वाची नागरपरिषद म्हणून माजलगावकडे पाहिले जात असले तरी आरोप- प्रत्यारोपातून माजलगावचे राजकारण सध्या तरी पेटले आहे.

इतर बातम्या-

नाशिकच्या वीज कामांबाबत ऊर्जा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक, अभियंत्यांबाबत तक्रारी, काय झाला निर्णय?

Sayani Gupta : अभिनेत्री सयानी गुप्ताचा हटके अंदाज, ‘यलो’ लूकची सोशल मीडियावर चर्चा

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.