बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ता तिच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमी इन्स्टाग्रामवर तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते. आताही तिने असेच हटके फोटो शेअर केले आहेत.
1 / 5
सयानीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि त्याला पिवळ्याच रंगाचं बॅगराऊंड आहे. तिचा ' यलो यलो' लुक तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरताना दिसतोय.
2 / 5
सयानी ही मूळची पश्चिम बंगालमधल्या कोलकाताची आहे. तिला आधीपासूनच अभिनयाची आवड होती. तिने अनेक बंगाली आणि हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
3 / 5
सयानी वेगवेगळ्या गेटअपमधले आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांआधी तिने घातलेला हा ब्लॅक कलरचा हा ड्रेस तिच्या लूकला सूट करणारा आहे.
4 / 5
सयानी जितकं फॅन्सी कपड्यात कंफर्टेबल असते तितकंच ती पारंपरिक साडीतदेखील कंफर्टेबल असते. काही दिवसांआधी तिने हा साडीतला हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.