बीडमध्ये अभियंत्यावर लाच घेतल्याचा आरोप, ‘व्हायरल व्हिडिओ बनावट, माझा काहीही संबंध नाही’, अभियंत्याची स्पष्टोक्ती

बीड जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी कामाचे बिल काढण्यासाठी टक्केवारीने पैसे घेत असल्याचा आरोप करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

बीडमध्ये अभियंत्यावर लाच घेतल्याचा आरोप, 'व्हायरल व्हिडिओ बनावट, माझा काहीही संबंध नाही', अभियंत्याची स्पष्टोक्ती
पुरुषोत्तम हाळीकर यांचा व्हिडिओ व्हायरल

बीडः बीड जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी कामाचे बिल काढण्यासाठी टक्केवारीने पैसे घेत असल्याचा आरोप करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात जिल्हा परिषदेचे मुख्य अभियंताच पैसे घेत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता पुरुषोत्तम हाळीकर (Purushottam Halikar) यांचा हा व्हिडीओ आहे. व्हिडिओमध्ये हाळीकर आधी फाईलवर सही करतात आणि एक नोटाचे बंडल स्वीकारताना दाखवले आहे. हा व्हिडिओ एका ठेकेदाराने मोबाईल कॅमेरात कैद केला आहे.

व्हिडिओशी माझा संबंध नाही- हाळीकर

दरम्यान ज्यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय ते अभियंता पुरुषोत्तम हाळीकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा व्हिडीओ मार्फ करण्यात आला असून त्या व्हिडीओचा माझा काहीही संबंध नसल्याचे हाळीकर म्हणतायत. ज्या कोणी खोडसाळपणा केलाय त्यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचेही अभियंता हाळीकर म्हणाले.

खोडसाळपणा करणाऱ्यांविरोधात पोलिसात जाणार

दरम्यान, आपण लाच घेत असल्याचे दाखवणारा बनावट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया हाळीकर यांनी दिली आहे. माझा या प्रकरणाशी संबंध नसून यामुळे उगाच बदनामी होत केली जात आहे. या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

इतर बातम्या

निवड झाली आता अंमलबजावणी करा अन् योजनेचा लाभ घ्या, पशूसंवर्धन विभागाचे काय आहे आवाहन?

Uddhav Thackeray | ‘मतं मागताना लोक झुकलेले असतात, ती मिळाल्यानंतर मात्र ताठ होतात’


Published On - 2:54 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI