मनसेच्या कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात नांदुरघाट गावात किर्तनाचे आयोजन केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यासाठी त्यांनी पोलिस आणि इतर प्रशासनाची परवानगी घेतली होती का ? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. जर का प्रशासनाची परवानगी घेतली होती, तर इतकी लोक जमली कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कीर्तनाच्या ठिकाणी कोणत्याही पध्दतीची काळजी घेतलेली नाही. तसेच लोकांनी कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टंन्सिंग पाळलेलं नाही. त्यामुळे तिथं काही दिवसात कोरोना वाढण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच परवानगी नसताना असा कार्यक्रम केल्याने आयोजकांना आणि निवृत्ती इंदोरीकर महाराजांवरती प्रशासन कोणती कारवाई करेल हे काही दिवसात स्पष्ट होईल.