Photo Gallery : नाशिकमध्ये जीवघेणी पतंगबाजी, 16 पक्षी जखमी…!
नाशिक जिल्ह्यात मकरसंक्रांत अक्षरशः जीवघेणी ठरलीय. शहरात नायलॉन मांजामुळे गळे चिरल्याच्या अनेक घटना घडल्या. गेल्या काही दिवसांमध्ये दोन कबुतरांसह घार, घुबड, कावळा, आयबीस, बगळा असे 16 पक्षी शहरात जखमी झाले असून, त्यापैकी 13 जणांना जीवदान दिले, तर एका घुबडाचा मृत्यू झालाय. गेल्या वर्षी शहरात 173 पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी झाले. यंदा शहर पोलीस आणि विविध सामाजिक संस्थांनी नायलॉन मांजा वापरू नये म्हणून जनप्रबोधन केले. इको एको फाउंडेशनचे 15 सदस्य शहरात जखमी पक्ष्यांना शोधून त्यांना उपचारार्थ अशोकस्तंभ येथील पशूवैद्यकीय रुग्णालयात दाखल करत आहेत. तर पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टर व 30 विद्यार्थी तत्काळ जखमी पक्ष्यांवर उपचार करत आहेत. हे पाहता आपण सारे शहाणे होऊयात. नायलॉन मांजा वापरणे टाळूया. संक्रांत जीवघेणी होण्यापासून वाचवूया.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
10 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या CNG कार कोणत्या
दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड, आता काय?
डायबिटीजची दुश्मन आहेत ही 5 भरडधान्य, पाहा कोणती ?
थंडीत अक्रोड खाणं आरोग्यास किती लाभदायक? जाणून घ्या फायदे
Year Ender 2025 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 2025 वर्षातील सर्वात यशस्वी गोलंदाज, कुलदीप यादव कितव्या स्थानी?
वनडेत 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण? रोहित-विराट कुठे?
