AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लाडकी बहीण योजने’वरून जरांगेंचा सरकारला सवाल; म्हणाले, बहिणीला पैसे दिले, पण…

Jarange Patil on Ladki Bahin Yojana : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासंदर्भात आग्रही भूमिका घेताना दिसतात. आताही मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी लाडकी बहिण योजनेवरून सरकारला टोला लगावला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. वाचा...

'लाडकी बहीण योजने'वरून जरांगेंचा सरकारला सवाल; म्हणाले, बहिणीला पैसे दिले, पण...
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 27, 2024 | 1:45 PM
Share

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील सध्या विविध भागात दौरा करत आहेत. बीड जिल्ह्यातील तांदळा गावाला त्यांनी भेट दिली यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. शिवाय ‘लाडकी बहीण योजने’वरही मनोज जरांगे यांनी भाष्य केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. चांगली योजना आहे. तुम्ही पण सगळ्यांनी फॉर्म भरा. कारण ते आपलेच पैसे आहेत. देवेंद्र फडणवीस काय त्यांची जमीन विकून पैसे देत नाहीत. पण तुम्ही लाडकी बहिणीला पैसे दिले पण भाच्याचं काय? त्यांच्या आरक्षणाचं काय?, असा थेट सवाल मनोज जरांगेंनी केला आहे.

फडणवीसांवर निशाणा

आमची लेकरं जेलमध्ये घातलेत. मी त्यांना सरळ करणार आहे. रेकॉर्ड शोधणे बंद आहे. हे संपूर्ण देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरून होत आहे. भांडणं करून भांडणं करून मी सहा महिने ते मुदत वाढ घेतली. ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा हिशोब चुकता करणार आहे. हे सगळं जनतेच्या हातात आहे. लेकरांवर झालेला अन्याय विसरू नका. त्यादिवशी यांचा करेक्ट कार्यक्रम करा, असं मनोज जरांगे म्हणालेत.

मराठा समाजाचा धसका घेत देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली होती. माञ मी डाव टाकला आणि 29 तारखेला होणारी बैठक पुढं ठेवली आणि देवेंद्र फडणवीस यांचा डाव हुकला. राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी वातावरण गढूळ केलं आहे. मी मॅनेज होणारा नाहीं म्हणुन माझ्याविरोधात डाव रचला जातो. हा देवेंद्र फडणवीसांचा गनिमी कावा आहे. हैदराबादला साडेतीन हजार कुणबी नोदीचे पुरावे सापडले असतानाही देवेंद्र फडणवीस इकडे आणू देत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांवर अन्याय केला आहे, असंही जरांगे म्हणाले.

मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा

मनोज जरांगे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. मी यांचा कार्यक्रम लावतो. आता आखाडा जवळ आला आहे. सावध राहण्याची गरज आहे. या वेळेस सगळ्यांना पाणी पाजायचे आहे. यांना यांची जागा येणाऱ्या काळात दाखून द्यायची आहे. 29 तारखेची बैठक रद्द केली. मी जर उभा करायचं म्हटलं की भाजप खुश होतं. पण मी त्यांच्यापेक्षा पुढचा आहे. या निवडणुकीत यांना पाणीच पाजायचंच आहे. यांना खुर्ची भेटू द्यायची नाही. हे सरकार मराठा समाजाचा मुळावर उठलं आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं