
MP Bajrang Sonawane: बीडमध्ये राजकीय गुन्हेगारीचा क्रूर चेहरा राज्यासमोर आला. बीडमधील औष्णिक वीज केंद्रातील राखेसाठी हत्या, पवनचक्की कंत्राटातील हत्या एकामागून एक समोर आल्या. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. समाजमन या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ पाहून सुन्न झाले. या हत्येतील सर्व पदाधिकारी हे राजकीय पक्षांशी संबंधित होते. काल संतोष देशमुख यांचा पहिला स्मृतीदिन झाला. त्यावेळी मनोज जरांगे, अंबादास दानवे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. त्यावेळी सोनवणे यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
खासदार बजरंगबप्पा सोनवणे यांनी याप्रकरणी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाला असं यावर विश्वास बसत नाही मी धनंजय ला सांगितलं की आपण सावरलं पाहिजे. धनंजयने आत्तापर्यंत अन्नाचा कण घेतला नाही. इतिहासामध्ये घडली नाही अशी क्रूर हत्या ही घडली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्हाला समाधान लाभणार नाही. माणूस गेला आहे. या प्रकरणात आरोपींना अटक झाली हा समाधानाचा विषय नाही. या प्रकरणात सर्वांना शिक्षा झाली पाहिजे. तळहाताच्या पुड्याप्रमाणे सरपंचाला गावकरी सांभाळत होते ते बिनविरोध सरपंच असल्यासारखे होते.
तपासाला का लागला ब्रेक?
बजरंग सोनवणे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यानुसार, संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृहखात्याने तो थांबवला की अन्य कोणी थांबवला हे पाहिलं पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणी कुणाचा सारखा दबाव येतोय याची चर्चा होत आहे. या प्रकरणात जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाचा तपास पूर्ण केला पाहिजे. या प्रकरणात तपासाला कॅप टाकली आहे ती कॅप काढा आणि तपास पुढे करा अशी मागणी त्यांनी केली.
धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा
धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा हे प्रश्न विचारण्याची का वेळ का यावी जे सत्य आहे ते झालं पाहिजे, असे बजरंग सोनवणे म्हणाले. या प्रकरणाचा तपास थांबवला आहे हा तपास कोणी थांबवला आहे हा तपास पुढे गेला पाहिजे. मी आज आरोप करणार नाही गृह खात्याने थांबवला की कोणी थांबवला हे बघितले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
धस सत्तेच्या बाजूने आहेत. त्यांनी त्यांची बाजू मांडली त्यांची समाधान झाले असेल. पण मी समाधानी नाही. मोकळ्या वातावरणात तपास करा शेवटच्या टोकापर्यंत जा. या प्रकरणात ज्यांनी आरोपींना पळून जायला साथ दिली त्यांना काय केलं साधी नोटीस तरी दिली का? असा सवाल सोनवणे यांनी केला.
मनोज जरांगे काय बोलले हे ऐकलं पाहिजे. मी ते ऐकल्यानंतर याच्यावर प्रतिक्रिया देतो. ते काय म्हणले आहे ते मला बघू द्या.या प्रकरणात अजितदादा, धनंजय मुंडे यांच्या सोबत आहेत का? मुख्यमंत्री आहेत हे बघितलं पाहिजे. लोकांच्या समस्या असल्यास की टोळीच्या समस्या असल्यास फोन येतो हे बघितलं पाहिजे. लोकांनी किती प्रेम केलं आहे हे नगरपालिका निवडणुकीत कळेल, अशी प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली.