Bhandara Murder Video : ‘आमच्या मुलीला त्रास देतो काय?’ म्हणत सचिनचा चाकूने भोसकून खून! हायवेवर आडवा पाडून सपासप वार

सचिन गाडीवर होता. आरोपीने सचिनवर सपासप वार केले. दुसरे दोघे खाली उतरले. सुऱ्याच्या वारात सचिन खाली पडला. गाडी दुसरीकडं पडली. अशाच आरोपीने बकरा कापतात. तसा सुऱ्याने सचिनच्या मानेवर धो-धो धुतले. सचिन तडफडत होता. जीवाच्या आकांताने ओरडत होता.

Bhandara Murder Video : 'आमच्या मुलीला त्रास देतो काय?' म्हणत सचिनचा चाकूने भोसकून खून! हायवेवर आडवा पाडून सपासप वार
तुमसर शहरात प्रेमप्रकरणातून चाकूने भोसकून खून
Image Credit source: t v 9
तेजस मोहतुरे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 04, 2022 | 11:17 AM

भंडारा : प्रेमप्रकरण (Love affair) कोणत्या स्थराला जाईल, काही सांगता येत नाही. कुटुंबीयांचा विरोध असला म्हणजे प्रकरण गंभीर होते. अशीच धक्कादायक घटना तुमसर शहरात घडली. प्रकरण असे की, तुमसरातील सचिन मस्के (Sachin Muske) नावाच्या मुलाचं एका मुलीवर प्रेम होतं. ते गेल्या काही दिवसांपासून लपूनचोरून भेटत असतं. पण, तीन-चार दिवसांपूर्वी सचिन प्रेयसीला घेऊन पळून गेला. दोघांनी दोन दिवस एकांतात घालवले. पण, घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं. त्यामुळं दोघेही आपआपल्या घरी परत आले. तरीही फोनवरून त्यांचं बोलणं-चालणं सुरुच होतं. ही बाब मुलीच्या घरच्यांना खटकली. त्यांनी थेट तुमसर पोलिसांत (Tumsar Police) तक्रार केली. एवढ्यावरच ते थांबले नाही. तर त्यांनी सचिनवर याचा सूड उगवायचं ठरविलं.

पाहा हत्तेचा थरारक व्हिडीओ

नेमकं काय घडलं?

सचिन मस्केचा गेम करायचा प्लान ठरला. त्यानुसार, दोघेजण सचिनच्या गाडीवर बसून आले. सचिनला शहराच्या बाहेर आणले. गाडीवरून ते दोघेही उतरले. तेवढ्यात तिसरा आरोपी बाजूला सुरा घेऊन तयार होता. त्याने गाडीतून धारदार सुरा काढला. तो सुरा दुपट्ट्यात लपवून सचिनच्या दिशेने धावत सुटला. सचिन गाडीवर होता. आरोपीने सचिनवर सपासप वार केले. दुसरे दोघे खाली उतरले. सुऱ्याच्या वारात सचिन खाली पडला. गाडी दुसरीकडं पडली. अशाच आरोपीने बकरा कापतात. तसा सुऱ्याने सचिनच्या मानेवर धो-धो धुतले. सचिन तडफडत होता. जीवाच्या आकांताने ओरडत होता. पण, आरोपी त्याच्यावर मरेपर्यंत सुऱ्याने वार करत होता. सचिनने जीव सोडला की नाही, म्हणून दुसरे दोन मित्र त्याला पलटवून पाहत होते. हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला.

हे सुद्धा वाचा

जीव गेल्यानंतरच आरोपी पसार

सचिनवर सुमारे शंभरेक वार सुऱ्याने करण्यात आले. यात सचिन गडप्राण झाला. तो गेल्याची खात्री झाल्यानंतर सचिनसोबत आलेले दोन आरोपी आणि दुसरा रस्त्यात वाट पाहणारा असे तिघेही तिथून निघून गेले. रस्त्यावरून लोकं ये-जा करत होते. त्या कुणाचीही पर्वा त्यांनी केली नाही. त्यांच्यासमोरच सचिनचा खात्मा केला. हे प्रकरण तुमसर पोलिसांत पोहचले. आधीच सचिनच्या प्रेमप्रकरणाची तक्रार पोलिसांत झाली होती. त्यामुळं हे तीन आरोपी कोण आहेत, याचा शोध आता पोलिसांना घेता येणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें