Bhandara ZP | भंडारा जिल्हा परिषदेत भाजपची गटबाजी, 10 मे रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक, कुणाची सत्ता बसणार?

भंडारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापतीपदी जिल्ह्यात सात पैकी चार ठिकाणी राष्ट्रवादीचे सभापती झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक 10 मे रोजी आहे. यात कोण बाजी मारणार हे दोन दिवसांनंतरच कळणार.

Bhandara ZP | भंडारा जिल्हा परिषदेत भाजपची गटबाजी, 10 मे रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक, कुणाची सत्ता बसणार?
भंडारा जिल्हा परिषदेत 10 मे रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूकImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 1:43 PM

भंडारा : जिल्हा परिषदेत भाजपची आपसी गटबाजी शमविण्यासाठी भाजप प्रदेश महामंत्री व नागपूर विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळेची (Chandrasekhar Bavankule ) नियुक्ती निरीक्षकपदी करण्यात आली आहे. आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीसाठी प्रसिद्ध असलेले बावनकुळे जिल्हा परिषदेची भाजपची गटबाजी कशी शमवितात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यात नुकताच झालेल्या पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आपला परंपरागत मित्र काँग्रेससोबत (Congress) न जाता भाजपशी हातमिळवणी केली. अचानक झालेल्या या बदलामुळे सध्या जिल्ह्यातील राजकारण चांगलेच वातावरण तापले आहे. 10 मे रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत जिल्ह्यात राजकीय गणित बिघडू शकतात.

चरण वाघमारे-परिणय फुके असे दोन गट

सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे व काँग्रेस हे एकमेकांचे वैरी झाले आहेत. असे असताना भाजपासाठी सुवर्णसंधी आली आहे. मात्र एनवेळी भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे व भाजपचे विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या गटातील चढाओढ निर्माण झाली आहे. भाजपमधील अंतर्गत वाद पाहता भाजप पक्ष श्रेष्ठीने भाजप प्रदेश महामंत्री व नागपूर विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्यातील सूत्रे दिली आहेत. त्यामुळे भाजपच्या दोन गटांतील वाद बघता बावनकुळे हे गटबाजीचे इंद्रधनुष्य कसे पेलतात हे बघने महत्वाचे ठरणार आहे.

पंचायत समितीत 7 पैकी 4 जागी राष्ट्रवादी

भंडाऱ्यात पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला दिसून आला. जिल्ह्यातील 7 पैकी 4 पंचायत समितीवर राष्ट्रवादीने झेंडा रोवला. तर भाजपला एका सभापती पदावर तर, काँग्रेसला दोन सभापती पदावर समाधानी राहावे लागले. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सभापती मोहाडी, लाखांदूर, पवनी व भंडारा पंचायत समितीवर निवडून आले. भंडारा पंचायत समितीत रत्नमाला चेटुले, लाखांदूरला संजना वरखडे, पवनीत नूतन कुरझेकर, तर मोहाडीत रितेश वासनिक यांच्या गळात सभापती पदाची माळ पडली. तुमसर भाजपाचे नंदू रहांगडाले तर साकोलीत काँग्रेस गणेश आले व लाखनीत प्रणाली सारवे पंचायत समितीपदी निवडून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडं सर्वाचं लक्ष लागलंय.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.