औरंगाबाद : समस्त महाराष्ट्रात ‘भारूडरत्न’ अशी ओळख असलेले प्रसिद्ध लोककलावंत निरंजन भाकरे (bharudkar Niranjan Bhakre) यांचे आज (23 एप्रिल) निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबादेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर लोककलेची मोठी परंपरा पुढे घेऊन जाणारा एक बहुआयामी चेहरा हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सून नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. (Bharudkar Bharud ratna Niranjan Bhakre died recently due to Corona virus infection)