AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal: ‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ पुस्तकातील वादानंतर छगन भुजबळ म्हणाले, मी सर्व गोष्टींचा…आता आठ दिवसांनी…

Chhagan Bhujbal Book: पुस्तकातील सर्व दावे छगन भुजबळ यांनी फेटाळून लावले आहे. आता हे पुस्तक आपण वाचणार आहोत, तसेच आपल्या वकिलास पुस्तक वाचण्यास देणार आहोत, त्यानंतर आठ दिवसांनी मला जी कारवाई करता येईल ती करणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

Chhagan Bhujbal: 'द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' पुस्तकातील वादानंतर छगन भुजबळ म्हणाले, मी सर्व गोष्टींचा...आता आठ दिवसांनी...
द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ पुस्तकात छगन भुजबळ यांच्याबाबत दावा
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 08, 2024 | 11:21 AM
Share

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना ‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकामुळे मोठा बॉम्बगोळा पडला. या पुस्तकात ईडीपासून सुटका करुन घेण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केली, असे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचे लिहिले आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील या दाव्यानंतर छगन भुजबळ यांनी शुक्रवारी तातडीने पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पुस्तकातील सर्व दावे फेटाळून लावले आहेत. आता हे पुस्तक आपण वाचणार आहोत, तसेच आपल्या वकिलास पुस्तक वाचण्यास देणार आहोत, त्यानंतर आठ दिवसांनी मला जी कारवाई करता येईल ती करणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’  या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या हेतूबाबत भुजबळ यांनी संशय व्यक्त केला. पुस्तकात आणि वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमी बाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ

छगन भुजबळ म्हणाले, ‘लोकसत्ते’बरोबर अशी कोणतीही मुलाखत मी दिली नाही. ईडीपासून सुटका करण्यासाठी आम्ही सर्व भाजपसोबत गेले हा आरोप अनेक दिवसांपासून आमच्यावर होत आहे. तिसरे म्हणजे कोर्टाने महाराष्ट्र सदन प्रकरणात मला ‘क्लिन चीट’ दिली आहे. ही ‘क्लिन चीट’ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिली होती. त्यावेळी मी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पेढेही दिले होते.

पुस्तकातील सर्व दावे नाकारले

भुजबळ यांनी ‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ पुस्तकातील सर्व दावे नाकारले. ते म्हणाले, मला तुरुंगात जाण्याची भीती आहे, असा आरोप जो केला जात आहे, तो मी नाकारत आहे. मी विकासासाठी एकत्र आलो. आमच्याबरोबर ५४ लोक आहेत. त्यांच्यावर प्रत्येकावर ईडीची केस नव्हती. माझ्या मतदार संघात दोन हजार कोटींची कामे सुरु आहे. सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो, त्याचा विकासासाठी फायदा झाला आहे.

पुस्तकाच्या हेतूबद्दल संशय

निवडणुकीच्या धामधुमीत हे पुस्तक का छापण्यात आले? त्यांचा हेतू काय आहे, हे पाहावे लागणार आहे. ठीक आहे, लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. मी पुस्तक वाचलेले नाही. आता मी पुस्तक वाचेल. त्यानंतर माझ्या वकिलांनाही ते वाचण्यास देईल. वकिलांसोबत चर्चा करेल. परंतु सध्या सात-आठ दिवस माझा सर्व फोकस निवडणुकीवर आहे. तो मी बदलणार नाही. त्यानंतर मला जे कारवाई करावी लागणार आहे, ते मी करणार आहे. पुस्तकातून नको, नको त्या गोष्टी माझ्या तोंडात टाकण्यात आल्याचे दिसत आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा