शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का, नेत्याचा शिंदे गटात प्रवेश होताच मुंबईत वातावरण तापलं, कार्यकर्त्यांचा हाय होल्टेज ड्रामा
शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत, पक्षाला गळती लागली आहे, आता मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत, शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, आणखी एका नेत्यानं शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, दरम्यान या पक्षप्रवेशामुळे मुंबईत वातावरण चांगलंच तापलं आहे, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रतिक्षा नगरचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, दरम्यान रामदास कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसैनिकांकडून कांबळे यांच्या फोटोला आणि बॅनरला काळं फासण्यात आलं आहे, यामुळे काही काळ वातावरण चांगलंच तापलं होतं, मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे, आतापर्यंत तब्बल 124 माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. कांबळे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, लोकांच्या विकासाठी कांबळे यांनी पक्षात येण्याचा निर्णय घेतला. कुठल्याही अटी शर्ती न ठेवता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ज्यांची मुंबईमध्ये सत्ता होती त्यांनी काय काम केलं? असा सवालही यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना शिंदे यांनी म्हटलं की, कांबळे यांना आपण युवा सेनेच्या कार्यकारीणीमध्ये घेत आहोत. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे. अनेक जण शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे लोक विकासाच्या मुद्द्यावर पक्ष प्रवेश करत आहेत, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. त्यापूर्वी हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी देखील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.
