मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? उद्या भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश, राजकीय घडमोडींना वेग
पुढील काही दिवसांमध्ये राज्यात महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, मात्र या निवडणुकांपूर्वीच आता पुन्हा एकदा आणखी एक मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसण्याची शक्यात आहे. मोठी बातमी समोर आली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रातील काही नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान झालं आहे. तर उर्वरित नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी येत्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका झाल्यानंतर लगेचच राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुकांची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक इच्छूक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा एक मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं, राज्यात तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं, दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाल्याचं पहायला मिळालं, अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप तसेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. दरम्यान हे इनकमिंग अजूनही सुरूच आहे. आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो, तेजस्वी घोसाळकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, तेजस्वी घोसाळर या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आहेत. जर त्यांनी उद्या भाजपमध्ये प्रवेश केला तर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरणार आहे. तर दुसरीकडे या पक्षप्रवेशामुळे भाजपचा फायदा होऊ शकतो. सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातील सुद्धा अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे सध्या शिवसेना शिंदे गट महायुतीमध्ये नाराज आसल्याची चर्चा आहे.
