
28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान हा अपघात होता की घातपात? अशी चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सुरुवातीपासूनच या अपघातावर संशय व्यक्त करत आहेत. दरम्यान आज या अपघातासंदर्भातील प्राथमिक अहवाल समोर आला आहे. एएआयबीकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये अनेक महत्त्ववाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. हे विमान जमिनीला धडकण्यापूर्वी आधी झाडावर कोसळलं आणि मग जमिनिला धडकलं असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच जेव्हा हा अपघात झाला, तेव्हा दृश्यमानता देखील कमी होती, असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान जेव्हा हा अपघात झाला तेव्हा शेवटच्या काही मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं? शेवटचं संभाषण काय होतं, याची माहिती देखील या अहवालामध्ये देण्यात आली आहे. 8 वाजून 29 मिनिटं, 25 सेंकद इथपासून ते 8 वाजून 46 मिनिट आणि 13 सेंकदांपर्यंत म्हणजे अपघातापर्यंत विमान आणि बारामती एटीसी यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला? याची माहिती या अहवालामध्ये देण्यात आली आहे. शेवटच्या काही सेंकदामध्ये पायलट ओशेट, ओशेट असं म्हटला परंतु त्याला बारामती एटीसीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असं या अहवालामध्ये म्हटलं आहे. दरम्यान या अहवालावर आता रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्राथमिक अहवालामध्ये बारामती एअरफिल्ड हे बारामती जिल्ह्यात आहे, असा उल्लेख या प्राथमिक अहवालामध्ये करण्यात आला आहे, आता नेमक्या याच चुकीवर बोट ठेवत रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
‘प्राथमिक अहवालात AAIB ने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे? या अहवालातील पान क्रमांक ४ वरील मुद्दा ५.१ मधील “Baramati Airfiled is situated in the Baramati District of the state Maharashtra” हे वाक्य AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसं आहे. परवा मुंबईत यावर विस्तृत बोलेल.’ असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
प्राथमिक अहवालात AAIB ने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे?
या अहवालातील पान क्रमांक ४ वरील मुद्दा ५.१ मधील “Baramati Airfiled is situated in the Baramati District of the state Maharashtra” हे वाक्य AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने… pic.twitter.com/wBqnip7tjA
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 28, 2026
दरम्यान एएआयबीकडून हा 22 पानांचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये अपघातासंदर्भात कोण कोणत्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली, त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.