AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil car accident : गौतमी पाटील कार अपघात प्रकरणात मोठं ट्विस्ट, रोहित पवारांनी केला मोठा दावा

गौतमी पाटीलच्या कारमुळे एका रिक्षाचा अपघात झाला होता, हे प्रकरण आता चांगलंच तापलं असून, या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट निर्माण झालं आहे.

Gautami Patil car accident : गौतमी पाटील कार अपघात प्रकरणात मोठं ट्विस्ट, रोहित पवारांनी केला मोठा दावा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 04, 2025 | 5:57 PM
Share

पुण्यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारचा अपघात झाला होता, तिच्या कारने रिक्षाला धडक दिली, या अपघातामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातासंदर्भात आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते डीसीपींना गौतमी पाटीलवर कारवाई करण्यासंदर्भात फोनवरून सूचना देताना दिसत आहेत, दरम्यान यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. सोबतच जेव्हा अपघात झाला तेव्हा त्या गाडीमध्ये गौतमी पाटील नव्हती असा मोठा दावा देखील त्यांनी केला आहे.

नेमकं काय म्हटलं रोहित पवार यांनी? 

‘तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही…! आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल.. पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात?’ अशी पोस्ट रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे.

दरम्यान दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी देखील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जाऊन या अपघाताची माहिती घेतली आहे. पोलीस गौतमी पाटीलला वाचवत असल्याचा आरोप या अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाच्या  नातेवाईकांकडून यावेळी करण्यात आला आहे. लोकांनी पुरावे आणून देण्यापेक्षा तुम्ही वेगाने तपास करा, गरीब माणूस आहे, तपास व्यवस्थित करा अशा सूचना यावेळी धंगेकर यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.