AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठं ट्विस्ट, एनडीएनं महाराष्ट्रातील या बड्या नेत्यावर सोपवली सर्वात मोठी जबाबदारी

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीएकडून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठं ट्विस्ट, एनडीएनं महाराष्ट्रातील या बड्या नेत्यावर सोपवली सर्वात मोठी जबाबदारी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 08, 2025 | 9:23 PM
Share

उद्या म्हणजे मंगळवारी उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर इंडिया आघाडीच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत एनडीएकडून शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपावण्यात आली आहे. एनडीएकडून खासदार डॉ. शिंदेंची उमेदवार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील अशा विश्वास यावेळी श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ‘उमेदवाराचे प्रतिनिधी’ म्हणून नियुक्ती केली आहे. मंगळवारी 9 सप्टेंबर 2025 रोजी संसदेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास यावेळी खासदार  शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपतीपदाचे ‘एनडीए”चे उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल असलेल्या सी.पी. राधाकृष्णन यांना यापूर्वीच शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी नवी दिल्लीत शिवसेना संसदीय पक्षाचे नेते  श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजप मंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. या बैठकीत मतदान कसे करायचे, मतदानाची प्रक्रिया खासदारांना समजावून सांगण्यात आल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. खासदार डॉ. शिंदे यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि मंत्री राम मोहन नायडू हे देखील ‘एनडीए उमेदवाराचे प्रतिनिधी’ म्हणून काम पाहणार आहेत.

कल्याण लोकसभा मतदार संघातून सलग तीनवेळा निवडून आलेल्या खासदार डॉ. शिंदे यांची संसदेत एक अभ्यासू संसदपटू अशी ओळख आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी भारताची भूमिका आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्राने पाठवलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे डॉ. शिंदे यांनी नेतृत्व केले होते. या शिष्टमंडळाने यूएई, काँगो, सिएरा लिओन, लायबेरिया या देशांना भेटी देऊन दहशतवादाविरोधात भारताची भूमिका ठामपणे मांडली.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.