AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : पैसे वाटून निवडणूक जिंकण्याच्या शरद पवारांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार प्रत्युत्तर

Devendra Fadnavis : बिहार विधानसभा निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात 10-10 हजार रुपये जमा करण्यात आले. त्या मुद्याकडे आज शरद पवारांनी लक्ष वेधलं. निवडणूक आयोगाने याचा विचार करावा असं शरद पवार म्हणाले. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis : पैसे वाटून निवडणूक जिंकण्याच्या शरद पवारांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार प्रत्युत्तर
Sharad Pawar-Devendra Fadnavis
| Updated on: Nov 15, 2025 | 1:23 PM
Share

बहुचर्चित बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला अपेक्षेपेक्षापण जास्त मोठं यश मिळालं आहे. जनता दल युनायटेड, भाजप यांच्या युतीने 202 जागा जिकंल्या आहेत. तेच राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस महाआघाडी फक्त 35 जागांवर आटोपली. महाराष्ट्रासारखेच निकाल बिहारमध्ये लागले आहेत. मागच्यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने असचं एकतर्फी यश मिळवलं होतं. बिहारच्या या निकालावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात जशी लाडकी बहिण तसं बिहारमध्ये पैसे वाटून निवडणूक होत असेल, तर निवडणूक आयोगाने विचार करावा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

“जो जिता वही सिकंदर. हरल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरिक्षण केलं पाहिजे. पण आत्मपरिक्षण करणं विरोधी पक्षाला मान्य नाही. खऱ्या अर्थाने या ठिकाणी वेगवेगळया प्रकारच्या योजना करण्याची संधी सर्वांना होती. त्यांचं सरकार होतं, तेव्हा त्यांनाही होती. त्यांनी केल्या नाहीत, आम्ही योजना आणल्या. लोकांना आवडल्या. लोकांनी आम्हाला मतदान केलं. त्यात लोकांना दोष देण्याचं कारण काय?” असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

बिबट्याच्या प्रश्नावर काय उत्तर दिलं?

‘जो पर्यंत ते आत्मपरिक्षण करणार नाहीत, तोपर्यंत ते मातीत जाणार’ असं फडणवीस म्हणाले. अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतली, त्यामागच्या कारणांबद्दल विचारलं असता, राज्यातल्या काही मुद्यांवर चर्चा केली असावी असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत आहे, त्यावर मी बैठक घेणार असल्याचं फडणवीस म्हणाले. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय, त्यावर फडणवीस यांना विचारलं. “विरोधी पक्ष एकत्र लढतोय की, स्वतंत्र लढतोय. यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचा महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती निवडून येईल” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट..

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’.

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’

महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश.

महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश

IND vs ZIM: म्हणे मी उपकर्णधार…खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच तिलक वर्मा भडकला, उत्तर देताना माज दाखवला.

IND vs ZIM: म्हणे मी उपकर्णधार…खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच तिलक वर्मा भडकला, उत्तर देताना माज दाखवला