लातूर: कोंबड्या, कावळे, पोपट आणि मधमाशांमध्ये बर्ड फ्लू आढळल्याने एकच खळबळ उडालेली असतानाच लातूरमध्ये एक अजबच प्रकार बघायला मिळाला आहे. लातूरमध्ये एका शेततळ्यात हजारो मासे अचानक मृत्यूमुखी पडल्याचं आढळून आलं आहे. अज्ञात रोगामुळे हे मासे मेले असल्याचं सांगण्यात येत असलं तरी स्थानिकांमध्ये मात्र बर्ड फ्लूमुळेच हे मासे दगावले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बर्ड फ्लूमुळे मासेही दगावत असल्याची अफवा किल्लारीवाडी येथे पसरली आहे. (Bird flu scare: thousand fish found dead in latur)