Bird Flu : मुळशीत बर्ड फ्लूचा विषाणू सापडला, 5 हजार कोंबड्यांची विल्हेवाट

Bird Flu : मुळशीत बर्ड फ्लूचा विषाणू सापडला, 5 हजार कोंबड्यांची विल्हेवाट

देशभरात ‘बर्ड फ्लू’चा कहर कायम आहे. बर्ड फ्लूसंदर्भात देशातील अनेक राज्यांनीही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अक्षय चोरगे

|

Jan 17, 2021 | 11:00 AM

पुणे : मुळशी तालुक्यातील नांदे येथे जिल्ह्यातील बर्ड फ्लूचा (Bird Flu) पहिला विषाणू आढळला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पशू संवर्धन विभागाच्या मावळ आणि मुळशीतील सर्व टीमच्या सहाय्याने काल संध्याकाळपर्यंत तिथल्या पोल्ट्रीतील सुमारे पाच हजारांहून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका पशूसंवर्धन अधिकारी डॅा. सचिन काळे यांनी दिली आहे. (bird flu virus found in Mulshi, 5,000 chickens disposed)

नांदे येथील शिंदे वस्तीवर राहत असलेले अमित अशोक रानवडे यांच्या पोल्ट्रीतील चार कोंबड्या काही दिवसांपूर्वी मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यानंतर रोज चार ते पाच कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. त्यामुळे चार दिवसांपूर्वी तेथील पोल्ट्री मालकाने मृत कोंबड्यांची पुणे येथील औंधच्या प्रयोगशाळेत तपासणी करून घेतली. त्यावेळी त्यात बर्ड फ्लूचा विषाणू नसल्याचा अहवाल देण्यात आला होता. तरीही कोंबड्यांचे मरण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने आणखी काही नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकडे पाठवण्यात आला. त्याचा अहवाल काल (शुक्रवार) उशिरा प्राप्त झाला. या पोल्ट्रीतील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूच्या विषाणूने झाल्याचे निष्पन्न झाले.

बर्ड फ्लूचा रिपोर्ट आल्यानंतर प्रशासनाने नांदे परिसरातील सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना सूचना देऊन जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खणून बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावली. नांदे येथील शिंदेवस्तीवरील एका शेतकऱ्याच्या घरगुती कोंबड्यांना बर्ड र्फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून तेथील संसर्ग झालेल्या भागाच्या एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत.

परभणीती पुन्हा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला

परभणी जिल्ह्यातील मुरंबा गावात बर्ड फ्लूमुळे मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर आता सेलू तालुक्यातही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सेलू तालुक्यातील कुपटा गावातील कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचा अहवाल शुक्रवारी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानंतर आज भल्या पहाटेपासूनच कुपटा गाव आणि 1 किलोमीटर परिसरातील 22 शेतकऱ्यांच्या कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्याचं काम सुरु आहे.

कुपटा गावात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहेत. कुपटा गाव आता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आलं होतं. आता या गावाच्या 5 किलोमीटर परिसरातील कोंबड्यांची खरेदी विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. पशुसंवंर्धन, आरोग्य, महसूल, भूजल, भूमी अभिलेख, कृषी विभागाचे अधिकारी या गावात तैनात करण्यात आले आहेत. पहाटेपासून 468 कोंबड्यांना शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्याचं काम पूर्ण झालं आहे. तर मोकळ्या सोडलेल्या कोंबड्या पकडताना कुक्कुटपालन व्यावसायिकांची चांगलीच दमछाक होत आहे. कोंबड्या नष्ट केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून परिसरात निर्जंतुकीकरणाचं काम करण्यात येत आहे. कुपटा गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वाजूला मोठा खड्डा करुन त्यात कोंबड्या पुरण्यात येत आहेत, अशी माहिती सेलू तालुका प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.

परभणीत 80 हजार कोंबड्या नष्ट

परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे कोंबड्या मेल्याचं आढळून आल्यानंतर 80 हजार कोंबड्या मारण्यात येणार आहेत, असं राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं. तसेच राज्यातील 6 जिल्ह्यांना बर्ड फ्ल्यूचा धोका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सुनील केदार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच आम्ही कोंबड्यांचे सँपल भोपाळला पाठवले होते. त्याचा अहवाल आला असून त्यात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत, असं केदार यांनी सांगितलं.

या जिल्ह्यांना धोका

नागपूर, लातूर, अमरावती, परभणी, नाशिक, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील कोंबड्यांचे सँपल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे, अशी भीती त्यांनी वर्तवली होती.

हेही वाचा

Bird Flu : परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला, कोंबड्या नष्ट करण्याचं काम सुरु

Bird Flu | ‘बर्ड फ्लू’ दरम्यान ‘चिकन’ खाणे किती धोकादायक? ‘या’ गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे!

(bird flu virus found in Mulshi, 5,000 chickens disposed)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें