AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचा महायुतीत मास्टर प्लान, 148 जागा घेऊनही 17 जागांवर धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हावर आपलेच उमेदवार

यंदा भाजपला अपेक्षित जागा लढता आलेल्या नाहीत. कारण अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत आल्यामुळे त्यांनाही जागांचा वाटा द्यावा लागला. मात्र असं असलं तरी शिंदेंचं धनुष्यबाण आणि अजितदादांचं घड्याळ या चिन्हावर भाजपचे जवळपास 17 उमेदवार यंदा उभे आहेत.

भाजपचा महायुतीत मास्टर प्लान, 148 जागा घेऊनही 17 जागांवर धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हावर आपलेच उमेदवार
भाजपचा महायुतीत मास्टर प्लान, 148 जागा घेऊनही 17 जागांवर धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हावर आपलेच उमेदवार
| Updated on: Oct 31, 2024 | 9:34 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व पक्षांच्या तुलनेत भाजप सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. महायुतीत तीन मोठे घटक पक्षांसोबत काही लहान पक्षांचादेखील समावेश आहे. तर महाविकास आघाडीतही तसंच गणित आहे. असं असलं तरी काँग्रेस आणि ठाकरे गटापेक्षा जास्त जागांवर भाजप निवडणूक लढवत आहेत. महायुतीत भाजपची बार्गेनिंग पावर जास्त असल्याने भाजप आपल्या 148 उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपने 148 जणांना अधिकृत पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. भाजप पक्ष एवढ्यावरच थांबला नाही तर पक्षाच्या तब्बल 17 नेत्यांना मित्र पक्षांमध्ये प्रवेश करायला सांगत त्यांना शिवसेनेच्या धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढायला लावत आहे.

आकडेवारीनुसार, महायुतीत भाजपनं 148, शिंदेंच्या शिवसेनेनं 80, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 53, मित्रपक्षांनी 5 जागांवर उमेदवार जाहीर केले. आणि अस्पष्ट चित्र असलेल्या 2 जागा असं एकूण 288 जागांचं गणित आहे. तर 7 जागांवर महायुतीत मविआबरोबरच एकमेकांचेही उमेदवार उभे आहेत. मविआत काँग्रेसने 103, ठाकरेंच्या शिवसेनेनं 89, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 87, मविआच्या मित्रपक्षांनी 6 जागा घोषित केल्या आहेत. 3 जागांवरचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. तर 4 जागांवर मविआतीलच उमेदवार एकमेकांच्या आमने-सामने आहेत.

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उभे असलेले भाजप नेते

  1. निलेश राणे कुडाळ विधानसभेत शिंदेंच्या धनुष्यबाण चिन्हावर
  2. राजेंद्र गावित पालघरमध्ये धनुष्यबाणावर
  3. भिवंडी पूर्वेतून संतोष शेट्टी
  4. अंधेरी पूर्वेतून मुरजी पटेल
  5. मुंबादेवीतून शायना. एन.सी,
  6. बोईसरमधून विलास तरे
  7. करमाळ्यातून दिग्विजय बागल
  8. नेवासातून विठ्ठल लंगे
  9. बाळापुरातून बळीराम शिरसकर
  10. धाराशीवमधून अजित पिंगळे
  11. संगमनेरातून अमोल खताळ
  12. कन्नडमधून संजना जाधव

राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उभे असलेले भाजपचे नेते

  1. प्रतापराव चिखलीकर – लोहा कंधारचे उमेदवार
  2. निशिकांत पाटील – वाळवा-इस्लामपूर मतदारसंघ
  3. संजयकाका पाटील – तासगाव-कवठेमहांकाळ
  4. राजकुमार बडोले – अर्जुनी मोरगावातून
  5. कलिनामधून आठवले गटाचे उमेदवार अमरजीत सिंह हे देखील मूळ भाजपचेच आहेत

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.