AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आता नगरसेवक, भाजपच्या निर्णयामुळे नव्या वादाला ठिणगी ?

गेल्या वर्षीच्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले तुषार आपटे यांची भाजपने स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती केली आहे. अक्षय शिंदे प्रकरणात शाळेच्या निष्काळजीपणामुळे आपटे सहआरोपी बनले होते. जामिनावर असतानाही त्यांना नगरसेवक केल्याने राज्यभर नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, याबाबत पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरेल.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आता नगरसेवक, भाजपच्या निर्णयामुळे नव्या वादाला ठिणगी ?
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी निवडणुकीच्या रिंगणात, कोणी दिली संधी ?
| Edited By: | Updated on: Jan 10, 2026 | 11:28 AM
Share

गेल्या वर्षी बदलापूरमधील एका नामांकित शाळेत काही चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला होता. या अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे या आरोपीचे नाव समोर आले, नंतर त्याला अटक व एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यूही झाला. मात्र आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण या लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेला सहआरोपी चक्क महापालिका निवडणुकांच्या रिंगणात उतरला आहे. याप्रकरणातील सहआरोपी शाळेचे सचिव, तुषार आपटे यांची भाजपने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपाने तुषार आपटे यांना बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक बनवल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून यामुळे नव्या वादाला ठिणगी मिळू शकते.

काय आहे प्रकरण ?

बदलापूरच्या शाळेत काही छोट्या मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याचे उघड झाले. याप्रकरणात त्या शाळेत काम करणारा शिपाई अक्षय शिंदे हा आरोपी असल्याचे उघड झाले. त्याला अटक करून खटला चालवण्यात येत होता. मात्र चकमकीदरम्यान तो मराला गेला. अक्षय शिंदेच्या चकमकीचं प्रकरण बहुचर्चित होतं, त्या प्रकरणात बदलापूरमधील शाळेवर आरोप करण्यात आले होते. त्या एसआयटीने शाळेतील संस्थाचलकांनाही सहआरोपी बनवून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केलेले होते. त्यातलेच एक आरोपी म्हणजे तुषार आपटे होय.

आणि आता कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने स्वीकृत नगरसेवक म्हणून याच तुषार आपटे यांची निवड केली आहे. कालच त्यांची निवड करण्यात आलेली आहे. मात्र लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या आपटे यांच्या निवडीवरून वेगवेगळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. अक्षय शिंदेंचं प्रकरण झालं तेव्हा तुषार आपटेंवर राजकीय आरोपही झाले होते. त्या शाळेवर आरोप झाले, शाळा व्यवस्थापनालाही आरोपी ठरवण्यात आलं होतं. शाळा व्यवस्थापनाने केलेल्या निष्काळजीपणावर ठपका ठेवत शाळेचे जे संस्थाचालक आहेत, त्यातील जवळपास 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भाजपचं म्हणणं काय ?

एसआयटीनेसुद्धा त्या संदर्भात अहवाल दिला होता. त्यातलेच सहआरोपी असलेलेल तुषार आपटे हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. मात्र त्याच आपटेंची भाजपने स्वीकृत नगरेवक म्हणून निवड केल्याने नवा वाद निर्माण होऊ शकतो. या सगळ्या वादानंतर भाजपची यावर नेमकी भूमिका काय ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या म्हणण्यानुसार तुषार आपटे यांनी नगरसेवक निवडून आणण्यसाठी मदत केली होती. म्हणून पक्षाने त्यांचा विचार करून, त्यांना स्वीकृत नगरसेवक बनवण्यात आलं असं सांगण्यात आलं. मात्र हा वाद पेटताना दिसत असून आता वरिष्ठ नेत्यांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.

बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा
बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा.
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत.
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप.
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड.
भाजपचं बेगडी हिंदुत्व, दानवेंकडून रावसाहेब दानवेंचा जुना व्हिडीओ ट्वीट
भाजपचं बेगडी हिंदुत्व, दानवेंकडून रावसाहेब दानवेंचा जुना व्हिडीओ ट्वीट.
भाजप आमदाराची भरसभेत थेट फडणवीसांकडे अजितदादांची तक्रार, म्हणाले...
भाजप आमदाराची भरसभेत थेट फडणवीसांकडे अजितदादांची तक्रार, म्हणाले....
जिसे लढना ना मालूम वह तीर तलवार क्या जाने, गुलाबराव पाटलानी सभा गाजवली
जिसे लढना ना मालूम वह तीर तलवार क्या जाने, गुलाबराव पाटलानी सभा गाजवली.
उद्धव ठाकरेंनी घोटाळे करुन मुंबईला लुटलं... एकनाथ शिंदेंनी वाचला पाढाच
उद्धव ठाकरेंनी घोटाळे करुन मुंबईला लुटलं... एकनाथ शिंदेंनी वाचला पाढाच.
ठाकरे म्हणाले अश्रू नव्हे हे अंगार! उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात का पाणी?
ठाकरे म्हणाले अश्रू नव्हे हे अंगार! उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात का पाणी?.
खोट्या गुन्ह्यात फडणवीस-शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न; अहवालातून मोठी...
खोट्या गुन्ह्यात फडणवीस-शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न; अहवालातून मोठी....