भाजपात प्रवेश करताच बाळासाहेब सानप यांना मोठी जबाबदारी, चंद्रकांत पाटलांकडून नियुक्तीचे पत्र

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या खांद्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे (BJP gives big responsibility to Balasaheb Sanap).

भाजपात प्रवेश करताच बाळासाहेब सानप यांना मोठी जबाबदारी, चंद्रकांत पाटलांकडून नियुक्तीचे पत्र
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 3:05 PM

नाशिक : माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या खांद्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. सानप यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सानप यांना नियुक्ती पत्र दिलं आहे. सानप यांनी गेल्या महिन्यात 21 डिसेंबर रोजी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजपच्या कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. सानप यांच्या प्रवेशाने आगामी नाशिक महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला फायदा होणार आहे (BJP gives big responsibility to Balasaheb Sanap).

“भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आपली प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करताना मला खूप आनंद होत आहे. आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात पक्ष संघटन वाढविण्यासाठी अथक परिश्रम कराल, ही अपेक्षा आहे. आपल्या आगामी कार्यास माझ्या शुभेच्छा”, असं चंद्रकांत पाटील सानप यांना पाठवलेल्या नियुक्ती पत्रात म्हणाले आहेत (BJP gives big responsibility to Balasaheb Sanap).

कोण आहेत बाळासाहेब सानप ?

– भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर – भाजपमधून 2014 साली नाशिक पूर्वमधून आमदार – 2019 मध्ये राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवली – विधानसभा निवडणुकीत सानप यांचा पराभव – पराभवानंतर सानप यांचा शिवसेनेत प्रवेश – नाशिक पूर्व भागात सानप यांची मोठी ताकद – गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अशी ओळख – नाशिक पालिकेवर भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली – आगामी नाशिक पालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का

धावत्या जगाचं, धावतं बुलेटीन, पाहा न्यूज टॉप 9, दररोज रात्री 9 वा. टीव्ही 9 मराठीवर

सानप का हवेत?

सानप हे पंचवटी परिसरात राहतात. या भागाचं त्यांनी प्रतिनिधीत्व केलं असून पंचवटीत त्यांचा दबदबा आहे. या परिसरातून 24 नगरसेवक निवडून जातात. नाशिकचा महापौर ठरवण्यामागे पंचवटीची नेहमीच मोठी भूमिका राहिली आहे. सानप पक्षात आल्यास किमान 15 नगरसेवक सहज निवडून आणणे सोपे होईल, असा प्रत्येक पक्षाचा अंदाज आहे. त्यामुळे सानप यांना पुन्हा पक्षात घेण्यास भाजपने हिरवा कंदिल दाखवला आहे. शिवाय राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने हे तीन पक्ष एकत्र लढल्यास भाजपला मोठं नुकसान सोसावं लागणार आहे. त्याशिवाय नाशिकमध्ये मनसेची मोठी व्होटबँक असल्याने भाजपसाठी ती सुद्धा एक मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळेच भाजपने सानप यांना पक्षप्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हेही वाचा : हायकोर्टाचा सोनू सूदला मोठा दिलासा, 13 जानेवारीपर्यंत कारवाई न करण्याचे BMC ला आदेश

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.