उदयनराजेंची अनोखी स्टाईल, जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित चेअरमनचा असा सत्कार केला, की एकच हशा पिकला…

| Updated on: Nov 19, 2026 | 10:09 PM

सातारा येथील खासदार उदयनराजेंची अनोखी स्टाईल नेहमीच चर्चेत असते. आता त्यांनी जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन अँड उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा सत्कार करताना उदयनराजेंनी अशी कृती केली की उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

सातारा येथील भाजपाचे नेते आणि खासदार उदयन राजे यांची अनोखी स्टाईल सर्वांनाच आवडते.अनेकदा त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलची चर्चा होत असते. मात्र सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी त्यांची आज जलमंदिर पॅलेस येथे भेट घेतली त्यावेळी त्यांनी अनोखा प्रकार केला. त्यांच्या या शैलीने अनेकांना आश्चर्यचकीत केले. उदयनराजेंनी त्यांच्या नेहमीच्या मिश्कील आणि हलक्याफुलक्या शैलीत उंडाळकरांचा अनोखा सत्कार केला. सत्कार करताना उदयनराजेंनी चक्क कॅमेऱ्यासमोर शाल आडवी धरली आणि उंडाळकरांच्या कानात काहीतरी कुजबुज केली. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या खेळीमेळीच्या वातावरणानंतर उदयनराजेंनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन उंडाळकरांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Published on: Nov 19, 2026 10:05 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us