AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: संजय राऊत एवढे थोडीच महत्त्वाचे आहेत, त्यांच्याबद्दल रोज काय बोलायचं?; फडणवीसांचा टोला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारले आहे. संजय राऊत एवढे थोडेच महत्त्वाचे आहेत. (bjp leader devendra fadnavis slams sanjay raut)

VIDEO: संजय राऊत एवढे थोडीच महत्त्वाचे आहेत, त्यांच्याबद्दल रोज काय बोलायचं?; फडणवीसांचा टोला
devendra fadnavis
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 4:41 PM
Share

परभणी: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारले आहे. संजय राऊत एवढे थोडेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलायचं?, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर टीका केली आहे. (bjp leader devendra fadnavis slams sanjay raut)

देवेंद्र फडणवीस आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणीत त्यांनी आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा, मी कालच राऊतांबद्दल बोललो आहे. त्यांच्याबद्दल मी रोज रोज काय बोलावं. ते एवढे थोडीच महत्त्वाचे आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

खासगी रुग्णालयाचं ऑडिट करा

परभणीतील कोरोना परिस्थिती बरी आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न सुरू केला आहे. ही समाधानकारक बाब आहे, असं ते म्हणाले. तसेच रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयाचं ऑडिट केलं पाहिजे. त्याची माहिती सरकारने घेतली पाहिजे आणि संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी केली. राज्यातील कोरोना मृत्यूची संख्या दडवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पीक विम्यावरून टीका

शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याबद्दलही त्यांनी सरकारवर टीका केली. पीक विमा आणि केंद्र सरकारचा काहीच संबंध नाही. राज्य सरकारने टेंडर उशिरा काढले. तसेच पीक विम्याचे नियम बदलले. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले जात होते. गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांना पीक विभ्याचा लाभ मिळत नाहीये, असं ते म्हणाले.

काय म्हणाले होते राऊत?

फडणवीस हे काल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले होते. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं होतं. विरोधी पक्ष आता जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. लोकशाहीत कोणी कुणाचा शत्रू नसतो. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे. ते खडसेंच्या घरी गेले, त्याचं स्वागत आहे. त्याआधी ते शरद पवारांना जाऊन भेटले. त्यांचं मार्गदर्शन घेतलं असेल. मागे आम्ही भेटून लंचही घेतलं होतं. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. कशाला धुरळा उडवता?, असंही टोलाही त्यांनी लगावला. (bjp leader devendra fadnavis slams sanjay raut)

संबंधित बातम्या:

तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात; संजय राऊतांची चंद्रकांतदादांवर खोचक टीका

‘…तर ते पवारांना ओळखतच नाहीत’, फडणवीस-पवार भेटीवर राऊतांचा रोखठोक अग्रलेख

शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा

(bjp leader devendra fadnavis slams sanjay raut)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.