जागा बळकावण्याचे काम ठाकरे सरकारने केले; सोमय्यांचा आरोप, अलीबाबा आणि 40 चोरांचा हिशेब 31 डिसेंबरपर्यंत देणार

किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांना देखील नोटीस वर नोटीस आली. त्यांनी ईडीला विनंती केली. 55 लाख चोरीचे पैसे परत केले. मोदींनी माफ केले. नाही तर संजय राऊत यांचा देखील नंबर होता, दावाही त्यांनी यावेळी केला.

जागा बळकावण्याचे काम ठाकरे सरकारने केले; सोमय्यांचा आरोप, अलीबाबा आणि 40 चोरांचा हिशेब 31 डिसेंबरपर्यंत देणार
किरीट सोमय्या, माजी खासदार

मुंबईः कोविड लॉकडाऊन घोषित केले. त्या काळात रुग्णालय बांधणे आणि त्याच्या बाजूला असणारी जागा बळकावण्याचे काम ठाकरे सरकारने केले, असा आरोप रविवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. ते मुलुंडमध्ये बोलत होते. सोमय्या म्हणाले, 11 नोव्हेंबर 2020 ला पहिला घोटाळा काढला. आता आणखी काही नवे येणार आहेत. अलीबाबा आणि 40 चोरांचा हिशेब येत्या 31 डिसेंबरपर्यंत ठेवणार आहे. आता माझा देखील अनिल देशमुख होणार, असे कोणाला वाटते. नवाब मलिकला माहिती असावी, असा टोला त्यांना हाणला. अन्वय नाईकसोबत त्यांचे काय संबध आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी केला. पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी 2 फाईलवर सह्या केल्या. एक मेट्रो आणि आणि दुसरी एक जमीन संदर्भात आहे. हे सरकार लुटारू आहे. पंतप्रधानांची शपथ भ्रष्टाचार संपवणार अशी आहे. मात्र, हे काय वेगळीच शपथ घेतात, अशी कोपरखळी त्यांनी हाणली.

सरनाईक कुठे गेले…

सोमय्या म्हणाले, आम्ही जालन्याला गेलो. तिथे शिवसैनिक आलो. मात्र, आम्ही घाबरलो नाही. 7 कोटी कार्यालयात आले कुठून. त्याची चोरी झाली कशी हे ईडीला सांगितले. ईडीने चौकशी सुरू केली आहे. भावना गवळींना विनंती केली आहे. तू 100 कोटींचा घोटाळा केला. तू नाही तर तुझ्या आईला जेलमध्ये जावे लागेल. प्रताप सरनाईक किती बोलत होते. आता कुठे गेले. ठाणे महापालिकेने नोटीस बजावली आहे अनधिकृत बांधकाम तोडण्याची. अनधिकृत बांधकामाबाबत आता बोलती बंद झाली. किशोरीताई आता बोलती बंद झाली, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मोदींनी माफ केल्याने राऊत वाचले

किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांना देखील नोटीस वर नोटीस आली. त्यानंतर त्यांना जाग आली आणि ईडीबाबत बोलणे महागात पडले. त्यांनी ईडीला विनंती केली. 55 लाख चोरीचे पैसे परत केले. मोदींनी माफ केले. नाही तर संजय राऊत यांचा देखील नंबर होता, दावाही त्यांनी यावेळी केला. पालकमंत्री अनिल परब रत्नागिरीला फाईव्हस्टार रिसॉर्ट बांधत होते. भारत सरकारची टीम आली. लोकायुक्तांनी नंतर तोडण्याची नोटीस दिली. मिलिंद नार्वेकरांच्या अनधिकृत बंगल्याचे काय झाले. अनिल परबांकडे 100 कोटी असतील, तर उद्धव ठाकरेंकडे किती पैसा असेल, असा सवालही त्यांनी केला.

जमीन लाटणार होते…

सोमय्या म्हणाले की, कोविड लॉकडाऊन घोषित केले. रुग्णालय बांधणे आणि त्याच्या बाजूला असणारी जागा बळकावण्याचे काम काम ठाकरे सरकारने केले. शेवटी आम्ही राज्यपालांकडे गेलो. त्यानंतर ठाकरे यांनी पाठ फिरवली आणि सर्व पेपर फाडले. आम्ही त्या ठिकाणी काहीही रुग्णालय बांधणार नाही असे सांगितले. खरे तर हे रुग्णालय बांधण्याचे काम नव्हते, कोविडखाली जमीन लाटण्याचे काम होते. जनता जागी झाली आहे. घोटाळेबाजांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. वाशीमध्ये मोठी घटना झाली. त्यानंतर अमित शहा यांनी मला पाठीशी उभे राहून संरक्षण दिले. मी भीत नाही, यांचे घोटाळे बाहेर काढण्याचे काम करत राहणार, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

इतर बातम्याः

हल्ली पुढारी नमस्कार सुद्धा करत नाहीत, यांच्या बापाचे काय जाते कळत नाही; अजितदादांचे जोरदार आसूड

अमोल इघे खून प्रकरणी नाशिक पोलिसांवर राजकीय दबाव, दरेकरांचा आरोप; विधिमंडळात आवाज उठवणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI