AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मोठा कट, फडणवीसांसह आम्हालाही…, नितेश राणेंच्या आरोपांनी खळबळ

भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, नितेश राणे यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मोठा कट, फडणवीसांसह आम्हालाही..., नितेश राणेंच्या आरोपांनी खळबळ
नितेश राणे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 10, 2026 | 4:17 PM
Share

महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा कट होता, असा आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला आहे, नितेश राणे यांच्या या आरोपांनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एवढंच नाही तर खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला देखील तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला, असं देखील यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.   ‘खऱ्या अर्थानं सत्तेचा गैरवापर काय असतो? प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्याला देवेंद्र फडणवीस यांच्या सकट खोट्या गुन्ह्यात अडकून जेलमध्ये कंस टाकायचं? हा एक कलमी कार्यक्रम सुरू होता, कोरोनाच्या काळात आपला महाराष्ट्र आधोगतीकडे जात असताना, उद्धव ठाकरेंचा कारभार नियोजन शून्य होता. तर दुसऱ्या बाजुला आपल्या सर्व विरोधी नेत्यांना राजकीय प्रतिस्पर्ध्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम उद्धव ठाकरेंचं सरकार जे काय करत होतं, त्याचा बुरखा फाडण्याचं काम झालेलं आहे.’ असं यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटानं काही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची एकत्र पत्रकार परिषद पार पडली यावर देखील नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते त्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे मुद्दे आहेत. ते संयुक्तपणे पुणे पालिका लढवीत आहेत. म्हणून त्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, असं यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळा बंद होऊ नयेत, आणि कोकणासाठी निकष वेगळे लावा हा माझा आग्रह आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आपल्या जिल्ह्याच्या गावागावातील शाळा बंद होता कामा नये आणि शासन म्हणून आमचा प्रयत्न असेल की जे निकष मराठवाडा, विदर्भाला आहेत, ते कोकणाला नको यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असंही यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे. एकूण  12 सभा आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी या सभा होत आहेत. महायुतीचा कार्यकर्ता म्हणून मी सगळीकडेच जाणार आहे, अशी माहितीही यावेळी राणे यांनी दिली.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...