‘नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय’, पत्रकार म्हणाले नाव सांगा, विखे म्हणतात, ‘रुको जरा सबर करो!’

नगरमध्ये थोरात-विखेंमधली सुंदोपसुंदी महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही. आता थोरातांचं थेटपणे नाव घेऊन नाही पण अप्रत्यक्षरित्या हल्ला चढवत त्यांच्या पापाचा घडा भरलाय, असं विखे पाटील म्हणाले. पत्रकारांनी मंत्र्याचं नाव विचारल्यावर मात्र, 'रुको जरा सबर करो' म्हणत लवकरच नाव उघड होईल, असा इशाराही त्यांनी दिलाय.

'नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय', पत्रकार म्हणाले नाव सांगा, विखे म्हणतात, 'रुको जरा सबर करो!'
राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 7:55 AM

मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील हे एकेकाळचे काँग्रेसचे दिग्गज नेते… फडणवीस सरकार असताना त्यांनी राज्याचं विरोधी पक्षनेतेपदही सांभाळलं. पण 2019 च्या निवडणुकांत काही राजकीय गणिते बदलली आणि त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचा झेंडा हाती घेतल्यापासून विखे पाटील काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवत आहेत. तर नगरमध्ये थोरात-विखेंमधली सुंदोपसुंदी महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही. आता थोरातांचं थेटपणे नाव घेऊन नाही पण अप्रत्यक्षरित्या हल्ला चढवत त्यांच्या पापाचा घडा भरलाय, असं विखे पाटील म्हणाले.

नगर जिल्ह्यातील मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय

नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल,’ असं सूचक वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे. विखे पाटील यांनी कोणाचंही नाव घेतले नाही. मात्र, त्यांचा रोख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याचं दिसून येतं.

पत्रकार म्हणाले, तो मंत्री कोण, विखे म्हणाले, ‘रुको जरा सबर करो!’

श्रीरामपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी हा आरोप केला. हा मंत्री कोण, असं पत्रकारांनी विचारलं असता ‘जरा सबुरीने घ्या, लवकरच नाव उघड होईल,’ असंही विखे पाटील म्हणाले. त्यांनी थोरातांचं थेट नाव घेणं जरी टाळलेलं असलं तरी त्यांचा रोख थोरातांकडेच होता, हे उघड आहे.

थोरातांचं नाव न घेता विखेंचा हल्ला

बाळासाहेब थोरात यांच्याकडे ठाकरे सरकारमध्ये महसूलमंत्रीपदाची जबाबदारी आहे. थोरातांच्या खात्यावर बोट ठेवत अप्रत्यक्षरित्या या खात्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं विखे म्हणाले. तसंच नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल, असंही विखे पाटील म्हणाले.

(BJP Radhakrishna Vikhe patil taunt Maharashtra Minister balsaheb thorat)

हे ही वाचा :

पवारांच्या एकेरी उल्लेखावर भडका, आता पाटील म्हणतात, पवारांनी 40 पैकी 38 गोष्टी पूर्ण केल्या !

उद्धव ठाकरेंच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावं लागलं, संजय राऊतांचा हल्ला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.