AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांच्या एकेरी उल्लेखावर भडका, आता पाटील म्हणतात, पवारांनी 40 पैकी 38 गोष्टी पूर्ण केल्या !

टीकेची झोड उठल्यानंतर आता चंद्रकांत पाटील बॅकफूटवर आले आहेत. त्यांनी शरद पवार याच्याबद्दल आदरच आहे, असे म्हणत स्तुतीसुमनं उधळली आहेत. विशेष म्हणजे पवार यांनी मुख्यमंत्री असताना 40 पैकी 38 गोष्टी पूर्ण केल्या असे तोंडभकरून कौतूक केले आहे.

पवारांच्या एकेरी उल्लेखावर भडका, आता पाटील म्हणतात, पवारांनी 40 पैकी 38 गोष्टी पूर्ण केल्या !
sharad pawar chandrakant patil
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 12:08 AM
Share

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा थेट एकेरी उल्लेख केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं होतं. टीकेची झोड उठल्यानंतर आता चंद्रकांत पाटील बॅकफूटवर आले आहेत. त्यांनी शरद पवार याच्याबद्दल आदरच आहे, असे म्हणत स्तुतीसुमनं उधळली आहेत. विशेष म्हणजे पवार यांनी मुख्यमंत्री असताना 40 पैकी 38 गोष्टी पूर्ण केल्या असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे तोंडभकरून कौतूक केले आहे.

पवार साहेबांनी 40 गोष्टी लिहून काढल्या, त्यातल्या 38 पूर्ण केल्या

“पवार साहेब विरोधक जरी असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात अनादर नाही. आमचा काही एकमेकांच्या बांधाला बांध नाही. उलट प्रमोद महाजन आम्हाला सांगायचे. मुख्यमंत्री होताना पवार साहेबांनी 40 गोष्टी लिहून काढल्या. त्यातल्या 38 पूर्ण केल्या,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

माझ्या मनात पवार साहेबांबद्दल आदरच आहे

तसेच पुढे बोलताना “मी अनावधानाने जो उल्लेख झालेला आहे, त्याबद्दल काही लोक बोलत आहेत. हे राष्ट्रवादीच्या पे रोलवर आहेत. त्यांना ते म्हणावंच लागतं. माझ्या मनात पवार साहेबांबद्दल आदरच आहे. अश्या प्रकारे आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ माणसाचा अनादर करणं आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हिंदू संस्कृतीने शिकवलेले नाही,” असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

 चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना, त्यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्याशिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथं यश मिळवून दाखवलं होतं. मी कीय त्या नेत्याचं नाव घेणार नाही. माझ्यावर केसेस सुरु आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं पाटील म्हणाले होते.

इतर बातम्या :

दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाची भरती परीक्षा आता 24 ऑक्टोबरला; 2 हजार 739 रिक्त पदे भरणार

विश्वजित कदमांना ‘करेक्ट कार्यक्रम’ची आठवण, तर ‘मी छोटा माणूस’ म्हणत जयंत पाटलांची टोलेबाजी, दोन्ही नेत्यांच्या भाषणाची चर्चा

जळगावमध्ये एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे, ‘भाजपच्या एकला चलो’नंतर जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची होणार

(bjp leader chandrakant patil appreciated ncp president sharad pawar said i have huge respect about him)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.