नाशिकमधून भुजबळांचा पत्ता कट? स्वयंसेवक संघ मैदानात उतरला; नाशिकमध्ये काय घडतंय ?

नाशिकच्या जागेसाठी संघाकडून पुन्हा सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. छगन भुजबळांना विरोध होत असल्याने दुसऱ्या उमदेवाराची चाचपणी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भुजबळांना होणारा वाढता विरोध बघता उमेदवार बदलण्याची तयारी सुरू झाली आहे.

नाशिकमधून भुजबळांचा पत्ता कट? स्वयंसेवक संघ मैदानात उतरला; नाशिकमध्ये काय घडतंय ?
नाशिकमधून भुजबळांचा पत्ता कट?
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 10:20 AM

नाशिकच्या जागेसाठी संघाकडून पुन्हा सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. छगन भुजबळांना विरोध होत असल्याने दुसऱ्या उमदेवाराची चाचपणी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भुजबळांना होणारा वाढता विरोध बघता उमेदवार बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटा कडून अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजप आणि संघाकडून राहुल ढिकले यांचं नाव आघाडीवर आहे.

हेमंत गोडसे हे नाशिकच्या जागेसाठी आग्रह आहेत तर भाजपचे दिनकर पाटील हेदेखील नाशिकच्या जागेची मागणी करत आहेत. ही जागा भाजपला सोडली जावी असा त्यांचा आग्रह आहे. या दोघांची नावं चर्चेत असतानाच अचानक छगन भुजबळ यांच्या नावाची नाशिकसाठी चर्चा सुरू झाली होती.

पक्षाकडून आदेश मिळाल्यास कामाला लागू असे सांगत भुजबळ यांनीही सूचक वक्तव्य केले होते. मात्र आता अचानक भाजपकडून राहुल टिकले यांचं नाव आघाडीवर आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भुजबळांना वाढता विरोध

नाशिक मतदारसंघासाठी अद्याप कोणताही नाव निश्चित झालेलं नसून नाशिकचा गोंधळ अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे. एकीकडे छगन भुजबळ यांचं नाव दोन आठवड्यांपूर्वी अचानक समोर आलं. मात्र त्यांचं नाव समोर येताच भाजप, शिंदे गट तसंच इतर मित्रपक्षांकजून विरोध व्हायला सुरूवात झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भुजबळांचं नाव समोर येताच मराठा समाजाचा मोठा आक्रोश पहायला मिळाला. भुजबळांविरोधात मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले, गावागावांत त्याच्या विरोधाचे फलक लागले.

नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो, असा इशारा जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना दिला. छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिल्यास काय करायचं, त्यावर योग्यवेळी भूमिका घेणार असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर आणि भुजबळांना होणारा वाढता विरोध पाहता, संघाकडून शहरात तसेच ग्रामीण भागातही पुन्हा एकदा सर्वेक्षणाला सुरूवात झाली. भुजबळांऐवजी महायुतीचा दुसरा उमेदवार कोण असू शकतं याची चाचपणी सुरू करण्यात आली. यामध्ये शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते आणि नाशिक पूर्वचे भाजपचे आमदार राहुल ढिकले या दोघाची नावं प्रामुख्याने पुढे आली आहेत. मात्र असं असलं तरी भुजबळांना बाजूला सारून, या दोघांपैकी एकाच्या नावाची अधिकृत घोषणा महायुतीकडून केली जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.