AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांची ताकद आपल्याकडे यावी म्हणून काळी जादू? रोहित पवार यांचा संशय काय? नेत्यांच्या करंगळ्या…

शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी नुकताच माध्यमांशी बोलताना अजित दादा जीवंत असतानाच त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक कादाचित नाशिकचा जो भोंदूबाबा आहे त्याच्या माध्यमातून करण्यात आले असावे असे म्हटले आहे.

अजितदादांची ताकद आपल्याकडे यावी म्हणून काळी जादू? रोहित पवार यांचा संशय काय? नेत्यांच्या करंगळ्या...
अशोक खरातImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 25, 2026 | 12:21 PM
Share

सध्या संपूर्ण राज्यात नाशिकमधील भोंदू ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणाची चर्चा सुरु आहे. या लिंगपिसाट अशोक खरातने अनेक महिलांवर बलात्कार केला. त्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर येताच त्याला अटक करण्यात आली. काल तर अक्षरश: राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशोक खरातच्या कारनाम्यांची कुंडली वाचली. अशोक खरातचे राजकीय लोकांशी देखील संबंध असल्याचे समोर आले आहेत. आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घराबाहेरील काळा जादू नाशिकच्या भोंदू बाबाने केली असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित दादा जेव्हा जीवंत होते तेव्हा बारमतीचं त्यांचं जे घर आहे त्याच्या बाहेर ब्लॅकमॅजिक झालेलं आपण बघितलेलं आहे. मुंबईमध्ये देखील त्यांचं जे राहतं घर होतं देवगिरी बंगला त्याच्या बाहेर सुद्धा अशीच काळी जादू झाली होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अजित दादांच्या पक्षामध्ये बरेच नेते आहेत ज्यांच्या करंगळीला कुठेतरी कापलं आहे, अंगठ्याला कापले आहे. काय करतात त्यांनाच त्या ठिकाणी माहिती. आता काळ्या जादूमध्ये कोण कोण त्या ठिकाणी अडकलेलं आहे? कोण असा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतं की दादांची ताकद जावी अन् त्यांच्याकडे ती ताकद यावी? याच्यामागे काय हेतू होता? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

पुढे रोहित पवार म्हणाले, अजित दादा जीवंत असतानाच त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं. कादाचित नाशिकचा जो भोंदूबाबा आहे त्याच्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर काळी जादू किंवा पूजा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मग ती काळी जादू नाही तर जी काही पूजा आहे त्याच्यामागचे कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा असं काही होतं का? त्यानंतर 28 तारखेला दुर्दैवी अजितदादांचा अपघात झाला की घातपात झाला? ते आम्ही शोधतच आहोत.

भोंदूबाबा प्रकरण नेमकं काय?

नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळ आणि बलात्काराचे गंभीर आरोप आहेत. आतापर्यंत त्याच्यावर सात गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या कथित ‘दैवी शक्ती’च्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या या साम्राज्याचा पर्दाफाश झाला आहे. सध्या भोंदू बाबाच्या आर्थिक व्यवहार, संपत्ती आणि राजकीय कनेक्शन यांची कसून चौकशी सुरु आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंमुळेच शिंदे आज फडणवीसांच्या मंत्रिमंडळात; राऊतांचा पलटवार
उद्धव ठाकरेंमुळेच शिंदे आज फडणवीसांच्या मंत्रिमंडळात; राऊतांचा पलटवार.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकरणात कर्नाटकात गुन्हा दाखल
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकरणात कर्नाटकात गुन्हा दाखल.
वन्यजीवांनाही सोडलं नाही, भोंदू खरातचे किळसवाणे कारनामे उघड
वन्यजीवांनाही सोडलं नाही, भोंदू खरातचे किळसवाणे कारनामे उघड.
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.