AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकरांचा पाय खोलात? भोंदू खरात प्रकरणात चौकशी होणार? मोठी अपडेट काय?

Ashok Kharat-Rupali Chakankar And Deepak Kesarkar: नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक छळापासून ते अन्य प्रकरणात आता राजकीय नेत्यांचे पाय खोलात असल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आणि शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

Ashok Kharat: रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकरांचा पाय खोलात? भोंदू खरात प्रकरणात चौकशी होणार? मोठी अपडेट काय?
अशोक खरात, रुपाली चाकणकर, दीपक केसरकरImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 25, 2026 | 12:23 PM
Share

Ashok Kharat-Rupali Chakankar And Deepak Kesarkar: नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात यांचे प्रकरण आता गंभीर वळणावर आहे. त्याने नरबळी दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. महिलांचे लैंगिक शोषण, जमिनी हडपणे तर आता त्यापेक्षा गंभीर आरोप आणि त्याचे पुरावे सुद्धा यंत्रणांच्या हाती लागले आहे. खरात आणि राजकीय नेत्यांचे लागेबंध काही लपलेले नाहीत. त्याचे अनेकांसोबतचे फोटो आणि पूजा करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात अनेक राजकीय नेत्यांच्या विकेट पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विरोधक खरातचा एनकाऊंन्टर होण्याची भीती व्यक्त करत आहेत. त्याचवेळी विधी मंडळातही याप्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय गंभीर असल्याचे आणि योग्य ती कारवाईचे आश्वासन दिले आहे. आज समोर आलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आणि शिंदे सेनेचे नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे पाय खोलात असल्याचे म्हटले जात आहे. त्यांची लवकरच याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक पोलीस करणार चौकशी

अशोक खरात याची शिवनिका ट्रस्ट आहे. त्याच्या सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची चौकशी नाशिक पोलीस करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन केले होते. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर याप्रकरणात सखोल तपास करण्यासाठी काही राजकीय नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

खरातवर कडक कारवाई व्हावी

दरम्यान याप्रकरणी दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरातने केलेला प्रकार अत्यंत घृणास्पद आहे आणि त्याच्यावर कठोरता कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केसरकरांनी केली. तर खरात हा आपण अंकशास्त्रात जगातील सगळ्या अभ्यासकांपैकी एक आहे अशी प्रसिद्धी करायचा. त्यामुळे लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता, पण आता जे बाहेर येत आहे, त्यावरून ते सर्व खोटं बोलत होते, असंच म्हणावं लागेल. याप्रकरणाकडे राजकीय दृष्टीने बघता कामा नये असे केसरकर म्हणाले.

चाकणकरांचं महिला प्रदेशाध्यक्ष पद जाणार?

तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ही भेट खरात यांच्यासंदर्भात असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील महिला नेत्या या चाकणकरांवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी तर चाकणकरांविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यामुळे आता याप्रकरणात चौकशी सुरू झाल्यास चाकणकरांना ही चौकशी पूर्ण होईपर्यंत या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो अशी चर्चा होत आहे.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!