AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मतदानावर बहिष्कार, महापालिका निवडणूक संकटात, कारण काय?

Boycott on Voting : निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना आता मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल 15 ते 20 हजार मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! मतदानावर बहिष्कार, महापालिका निवडणूक संकटात, कारण काय?
Boycott on votingImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 12, 2026 | 6:05 PM
Share

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे राजकीय नेते पायाला भिंगरी लावून सभा घेत आहेत. निवडणूक आयोगाकडूनही या निवडणुकींची तयारी पूर्ण होत आली आहे. आता 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, त्यानंतर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे. निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना आता मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल 15 ते 20 हजार मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मतदानावर बहिष्कार

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 15 तारखेला मतदान पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच जुहू परिसरातील 200 इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी पालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. याबाबतचे बॅनर जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी परिसरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी निवडणूक संकटात आली आहे.

नेत्यांची फक्त आश्वासने

जुहू परिसरात मिलिटरी रडार असल्यामुळे 35 वर्षापासून येथील 200 धोकादायक इमारती आणि दोन झोपडपट्ट्या विकासापासून दूर आहेत. जवळपास 15 हजार ते 20 हजार लोक या धोकादायक इमारतींमध्ये राहतात. या भागातील लोकांना केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडे अनेकदा पाठपुरावा केला, मात्र त्यांना यात यश मिळालेले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी येखील नागरिकांना त्यांच्या प्रश्न सोडण्याचे आश्वासन दिले होते, मात्र निवडणुकीनंतर नेते मदत करत नसल्याचं म्हणत नागरिकांनी पालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकरा आहे.

मनसे उमेदवार संदेश देसाई यांनी घेतली मतदारांची भेट

मुंबईतील जुहू रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात रहिवाशांकडून मतदानावर बहिष्कार घातल्याचा बॅनर लावण्यात आला आहे. यानंतर प्रभाग क्रमांक 68 मधील मनसेचे उमेदवार संदेश देसाई यांनी या नागरिकांची भेट घेतली. तसेच निवडणुकीनंतर नागरिकांची आणि दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घालून देत समस्यांचा पाठपुरावा करून तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता येथील नागरिक मतदानावरील बहिष्कार मागे घेतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर.
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर.
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका.
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'.
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्....
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं.
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य.
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर...
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर....
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ.