‘बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत काय-काय कारनामे…’, आमदार संजय कुटे यांचा खळबळजनक दावा

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे 'मातोश्री' बंगल्यात ज्या पवित्र खोलीमध्ये राहत होते, त्याच खोलीत उद्धव ठाकरे यांनी काय काय कारनामे केले, हे मला माहित आहे. मी वेळ आल्यावर ते सर्व कारनामे उघड करणार", असा इशारा संजय कुटे यांनी दिला आहे.

'बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत काय-काय कारनामे...', आमदार संजय कुटे यांचा खळबळजनक दावा
भाजप आमदार संजय कुटे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 8:51 PM

महायुतीचे बुलढाण्याचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीची बुलढाण्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाषण करताना भाजप आमदार संजय कुटे यांनी खळबळजनक दावा केला. त्यांनी हा दावा करत असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. त्यांच्या या दाव्यावर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘मातोश्री’ बंगल्यात ज्या पवित्र खोलीमध्ये राहत होते, त्याच खोलीत उद्धव ठाकरे यांनी काय काय कारनामे केले, हे मला माहित आहे. मी वेळ आल्यावर ते सर्व कारनामे उघड करणार”, असा इशारा संजय कुटे यांनी दिला.

संजय कुटे नेमकं काय म्हणाले?

“मातोश्रीत बाळासाहेब ठाकरे ज्या खोलीमध्ये राहत होते, त्या पवित्र खोलीमध्ये काय-काय कारनामे झाले, ते मी उघड करणार. जे काही कारनामे झाले त्याचा मी साक्षीदार आहे. माझ्यासमोर अनेक कारनामे त्या पवित्र खोलीत झाले आहेत. वेळ आल्यावर सर्वच कारणाने मी उघड करणार”, असं वक्तव्य संजय कुटे यांनी केलं.

संजय कुटे यांनी आपल्या वक्तव्यातून एकप्रकारे उद्धव ठाकरे यांना इशारा दिलाय. मात्र त्या खोलीमध्ये नेमके काय कारनामे झाले असावेत? नेमका काय सस्पेंस आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. आमदार संजय कुटे यांनी अशाप्रकारचं धक्कादायक विधान करून थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या पवित्र खोलीवर बोट ठेवलं आहे, अशी चर्च आता सुरु झाली आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरे गट VS भाजप संघर्ष वाढण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 19 एप्रिलला पार पडणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावर चर्चा सुरु आहे. जागावाटपाची अंतिम चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे. त्याला आता सुरुवात झाली आहे. आमदार संजय कुटे यांनी केलेली टीका ही सुरुवात आहे. आगामी काळात काय-काय आरोप-प्रत्यारोप केले जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. याआधी ते सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.