Ravikant Tupkar Accident | शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात, दुचाकीस्वार येऊन धडकले

सोयाबीन-कापुसप्रश्नी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला जात असताना शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या (Ravikant Tupkar Accident) गाडीला अपघात झाला आहे. भरधाव वेगाने रस्ता ओलांडताना दुचाकी रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला. सोमवारच्या रात्री ही घटना घडली.

Ravikant Tupkar Accident | शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात, दुचाकीस्वार येऊन धडकले
Ravikant Tupkar Car Accidnet

बुलडाणा : सोयाबीन-कापुसप्रश्नी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला जात असताना शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या (Ravikant Tupkar Accident) गाडीला अपघात झाला आहे. भरधाव वेगाने रस्ता ओलांडताना दुचाकी रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला. सोमवारच्या रात्री ही घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. तर, रविकांत तुपकर हे सुखरुप आहेत. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही जखमींना घेऊन रविकांत तुपकर औरंगाबादकडे रवाना झाले.

भरधाव वेगातील दुचाकीस्वार येऊन धडकले

बुलडाणा जिल्ह्यातील बेराळा फाट्याजवळ रात्री 10 वाजेदरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या इनोव्हा गाडीचा रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीसोबत अपघात झाला. ही दुचाकी भरधाव वेगाने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान, दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी तुपकरांच्या गाडीला येऊन धडकली.

या अपघातात दुचाकीस्वार दोघेही जखमी झाले आहेत. गजानन सोळंकी आणि तुषार परिहार अशी जखमींची नावे आहेत, ते दोघेही येवता येथील राहणारे आहेत. तर तुपकर यांच्या गाडीचेही या अपघातात खूप नुकसान झाले आहे. पण, तुपकर आणि त्यांचा ड्रायव्हर सुखरुप आहेत. विशेष म्हणजे तुपकरांनी स्वतः या दोन्ही जखमींना तात्काळ चिखली येथे उपचारासाठी आणले आणि तेथून औरंगाबादला पुढील उपचारासाठी घेऊन गेले आहेत.

रविकांत तुपकर हे इनोव्हा गाडीने मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बुधवार 24 नोव्हेंबर रोजी आयोजित बैठकीसाठी जात होते. याच दरम्यान चिखली क्रॉस केल्यानंतर त्यांच्या गाडीला अपघात झाला.

संबंधित बातम्या :

Swabhimani Protest | स्वाभिमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण, अज्ञातांकडून बुलडाणा तहसीलदार यांची जीप जाळण्याचा प्रयत्न

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI