AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बाळासाहेबांनी पानटपरी चालवणाऱ्याला आमदार केलं, तरीही गद्दारी केली”; ‘या’ नेत्यानं गुलाबराव पाटलांचा इतिहास वाचला

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केल्यानंतर जेलात असलेले रविकांत तुपकर आज अकोला कारागृहातून जामीनावर बाहेर आले आहेत.

बाळासाहेबांनी पानटपरी चालवणाऱ्याला आमदार केलं, तरीही गद्दारी केली; 'या' नेत्यानं गुलाबराव पाटलांचा इतिहास वाचला
| Edited By: | Updated on: Feb 16, 2023 | 11:03 PM
Share

बुलढाणाः शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि त्यांचे सहकारी अकोला जेलमधून बाहेर आल्यावर त्यांचे ठिकठिकाणी धुमधडाक्यात स्वागत होत आहे. तुपकर हे बुलढाण्यात पोहचल्यावरसुद्धा कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाके फोडत आणि अंगावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी तुपकर यांनी जनसंपर्क कार्यालयावर पोहचताच त्यांच्या कुटुंबीयांकडूनही त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना तुपकर यांनी संबोधित केले. यावेळी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांनी बोलताना बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली.

गुलाबराव पाटील यांनी तूपकर यांच्या आंदोलनाला नौटंकी आंदोलन म्हटले होते. त्यांच्या त्या वक्तव्याचा तूपकार जेलबाहेर आल्यावर चांगलाच समाचार घेतला आहे.

गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, गुलाबराव पाटील तुमचे घर काचाचे असून, गुवाहाटीला शेण खायला गेले होते का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

तर ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी पानटपरी चालवणाऱ्या गुलाबराव पाटील यांना अनेकवेळा मंत्री केले, त्यां ठाकरे कुटुंबासोबत तुम्ही गद्दारी केली आहे.

तुम्ही ठाकरे यांचे झाला नाहीत आणि तुम्ही आम्हाला शिकवू नका, योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही तुम्हाला चांगले उत्तर देऊ अशी खरमरीत टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे सरपंच झाले आहेत, ज्याप्रमाणे सरपंच याला फोन लाव, त्याला फोन लाव, नालीत पाणी गेले की फोन लाव, आपले मुख्यमंत्री तर ठाणेदारलाही फोन लावतात.

त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची गरिमा घालविली आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. पोलिसांनी आमच्यावर केलेला लाठीमार हा बॉसच्या सांगण्यावरून केला, असा आरोप करत तुपकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरही जोरदार प्रहार केला आहे.

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केल्यानंतर जेलात असलेले रविकांत तुपकर आज अकोला कारागृहातून जामीनावर बाहेर आले आहेत.

जेल बाहेर आल्यानंतर रविकांत तुपकर यांची जीभ चांगलीच घसरली असल्याचे दिसून आले. “शेतकऱ्यांच्या आंदोलनावर लाठी हल्ला करणाऱ्या पुढार्‍यांच्या लेकरांच्या तोंडात किडे पडतील, यांची मुलं चांगली निघणार नाहीत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

अकोला कारागृहातून आपल्या कार्यकर्त्यांसह जामीनावर बाहेर आल्यानंतर रविकांत तुपकर यांनी शेगावात गजानन महाराजांचे दर्शन घेतले. तर त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रविकांत तुपकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे रविकांत तुपकरांची या जेलवारीनंतर जीभ घसरली असल्याचं पाहायला मिळतंय.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.