AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफीचा धक्कादायक प्रकार उघडकीस, गुन्हा दाखल

आरोपीने फेसबुक, यू ट्युबवर चाईल्ड पोर्नचे व्हिडिओ अपलोड केल्याची माहिती समोर आली आहे (case register against child pornography).

नागपूरमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफीचा धक्कादायक प्रकार उघडकीस, गुन्हा दाखल
गहना वशिष्ठ ही शुटिंग झाल्यानंतर तो व्हिडीओ व्ही ट्रान्सफरवर अपलोड करायची. या व्हिडीओची एक लिंक ती अपलोडरला आणि एक लिंक उमेश कामतला पाठवायची.
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 10:45 AM
Share

नागपूर : नागपूरमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने फेसबुक, यू ट्यूबवर चाईल्ड पॉर्नचे व्हिडीओ अपलोड केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे (case register against child pornography).

नागपूरच्या गणेशपेठ, जरीपटका, सक्करदरा आणि नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतून हे व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. नागपूर पोलीस व्हिडीओ अपलोड करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत (case register against child pornography).

चाईल्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कडक कायदे केल्यानंतर, त्याबाबत धडक कारवाया सुरु आहेत. चाईल्ड पॉर्न व्हिडीओ किंवा त्यासंबंधित कोणता व्हिडीओ, फोटो तुम्ही कुणाला पाठवला तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागू शकते. चाईल्ड पॉर्न बनवणं, पाहणं, फॉरवर्ड करणं आणि त्याला प्रोत्साहन देणं भारतात कायद्याने गुन्हा आहे. असं असतानादेखील वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत आहेत.

गेल्या आठवड्यात पुण्यातून चाईल्ड पॉर्नच्या तब्बल 500 हून अधिक क्लिप इंटरनेटवर अपलोड झाल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली होती. याशिवाय चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी बीड जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले होते.

केंद्राचा कडक कायदा

चाईल्ड पॉर्न बनवणं, पाहणं, फॉरवर्ड करणं आणि त्याला प्रोत्साहन देणं भारतात कायद्याने गुन्हा आहे. आता यापुढे एक पाऊल टाकत केंद्र सरकारने लहान मुलांना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी आता फाशीची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीही 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार झाल्यास आरोपीला फाशी देण्याची तरतूद केंद्र सरकारने केली होती.

पाच महिन्यात भारतात 25 हजार चाईल्ड पॉर्न अपलोड

भारतातील चाईल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यात भारतातून तब्बल 25 हजार चाईल्ड पॉर्न व्हिडीओज् विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईट्सवर अपलोड झाले आहेत.

राजधानी दिल्लीतून सर्वाधिक चाईल्ड पॉर्न अपलोड करण्यात आलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा टॉप 5 मध्ये समावेश होतो. ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

संबंधित बातम्या : 

पुण्यातून 500 चाईल्ड पॉर्न क्लिप अपलोड, खडक पोलिसात तिसरा गुन्हा, एकाला अटक

पाच महिन्यात भारतात 25 हजार चाईल्ड पॉर्न अपलोड, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, अमेरिकेची आकडेवारी 

Whatsapp वर पॉर्न व्हिडीओ पाठवताय? बीडमध्ये दोन गुन्हे दाखल 

चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी आता फाशीची शिक्षा!

या कंपन्यांचं सिम वापरत असाल तर पॉर्न साईट चुकूनही पाहू नका

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.