पुण्यात पावसाची शक्यता ; हवामान खात्याने दिला ‘यलो अलर्ट’

हवामान  खात्याच्या अंदाजानुसार पुण्यात १४ नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस मेघ गर्जनेसह पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुण्यात यलो अर्लट जारी केला आहे. याच तीन दिवसात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुण्यात पावसाची शक्यता ; हवामान खात्याने दिला 'यलो अलर्ट'
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 12:56 PM

पुणे- अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबामुळे महाराष्ट्रात पावसाला पूरक वातावरण निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणजे राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान  खात्याच्या अंदाजानुसार पुण्यात १४ नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस मेघ गर्जनेसह पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुण्यात यलो अलर्ट जारी केला आहे. याच तीन दिवसात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची (Rain in maharashtra) शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामान खात्याने उद्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि बीड या दहा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात उद्या मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार आहे. दरम्यान, गतिमान वारे वाहणार असून याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका राहणार आहे.

थंडीचा कडका वाढला राज्यात पावसाचे वातावरण निर्माण होत असतानाच दुसरीकडे पुण्यासह राज्यातील इतर भागातही थंडीचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. पुण्यात यंदा १०. ८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्याच्या शिरूर , आंबेगाव या भागातही थंडीचा कडाका वाढला आहे. हेही वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.