चार मंत्री घरी जाणार, संजय राऊतांचा दावा, भुजबळ म्हणाले आता मी पण…
संजय राऊत यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना मंत्री भुजबळ यांनी खोचक टेला लगावला आहे. त्यांनी संजय राऊत यांना डिवचलं आहे. 4 मंत्री घरी जाणार असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

मंत्री छगन भुजबळ यांनी आज द्वारका सर्कची पाहाणी केली, यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. पूर्ण जबाबदारी ट्रॅफिक पोलिसांवर आहे, लहान गोष्टी आहेत पोलिसांना थोडं ट्रेनिंग दिलं तर अडचणी दूर होतील, कुठे अडचणी येऊ शकतात त्याबद्दल सांगितले, आमची कल्पना सांगितली, मोठे ब्रीज आहेत, त्यांना पिलर आहेत, त्यामुळे अडचणी टाळून रस्ता करावा लागेल असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान रविवारी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं होतं. चार मंत्री घरी जाणार आहेत, असा दावा त्यांनी या ट्विटमध्ये केला होता. ‘फडणवीस मंत्रिमंडळात रम रमी रमा रमणी! मी दिल्लीत आहे; चार मंत्री नक्की घरी जात आहेत; पाचवा गटांगळ्या खात आहे. मिंधे अजित दादांचे मुख्य नेते अमित शहा यांनी निर्णय घेतला! महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील!’ असं ट्विट राऊत यांनी केलं होत. राऊतांच्या या दाव्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
संजय राऊत यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना मंत्री भुजबळ यांनी खोचक टेला लगावला आहे. त्यांनी संजय राऊत यांना डिवचलं आहे. 4 मंत्री घरी जाणार असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं, त्यावर प्रत्युत्तर देताना आम्ही पण आता घरीच चाललो आहोत, असा उपरोधिक टोला, भुजबळ यांनी लगावला आहे.
माणिकराव कोकाट यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे, विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांची मागणी आहे, त्यावर मी काही बोलणार नाही, मला काही कल्पना, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोरच छावाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली होती. याबाबत भुजबळ यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळलं आहे. मला काही माहीत नाही, जे झाले ते पाहिले आहे त्यांनी सांगितले, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
