AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा, त्यांना जेलमध्ये टाका – मनोज जरांगे आक्रमक

मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर तीव्र टीका केली आहे. कुणबी प्रवर्गातील समाविष्टीच्या निर्णयावर भुजबळांनी विरोध दर्शविल्याने जरांगे पाटील नाराज झाले आहेत. त्यांनी भुजबळांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे. भुजबळांच्या भूमिकेमुळे सरकार आणि मराठा समाजाचा रोष वाढू शकतो, असे जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे. त्यांनी भुजबळांना सरकारपेक्षा मोठे मानण्यास नकार दिला आहे.

Manoj Jarange Patil : भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा, त्यांना जेलमध्ये टाका - मनोज जरांगे आक्रमक
मनोज जरांगे- छगन भुजबळ
| Updated on: Sep 10, 2025 | 12:19 PM
Share

छगन भुजबळ हे सरकारसाठी धोक्याची घंटा आहेत , त्यांना जेलमध्ये घाला अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. भुजबळ हे सरकार आणि फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत. भुजबळ नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावं असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला.मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांपैकी काही मागण्या सरकारने गेल्या आठवड्यात मान्य केल्या. राठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावरून ओबीसी मात्र नाराज झाले असून महायुतीमधील मंत्री असलेले छगन भुजबळ यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हा शासन निर्णय रद्द करावा किंवा त्यात सुधारणा करावी, अशी मागणी करत यासंदर्भात याचिका दाखल करणार असल्याचे काल भुजबळ म्हणाले होते.

मात्र भुजबळांच्या खोडा घालण्याच्या या भूमिकेमुळे मनोज जरांगे पाटील चांगलेच संतापले असून त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे.

फडणवीसांना भुजबळांमुळे डाग लागू नये, त्यांना पुन्हा आत टाका 

सरकारचा आणि मराठ्यांचा रोष आता कुठे कमी होतोय. भुजबळांमुळे तो वाढू नये. आणि देवेंद्र फडणवीसांना भुजबळांमुळे डाग लागू नये याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर त्यांना जेलमध्ये जाऊ दिलेलं बरं, कारण त्यांना तुम्हीच (सरकारने) बाहेर आणलं, आणि आता तुम्हालाच ते परत घातक बनणार असतील तर त्यांना पुन्हा जेलमध्ये टाका, तेच बरं. नाहीतर फडणवीस साहेबांच्या सगळ्या सरकारला छगन भुजबळ डाग लावू शकतो असं जरांगे म्हणाले.

भुजबळ सरकारसाठी डोकेदुखी

कारण त्यांना इतका प्रसिद्धीची, नावाची आणि चलतीची माज आणि मस्ती आहे. सरकारचं नाही माझं ऐकायचं असं त्यांचं (भुजबळ) म्हणणं आहे. तू काय बाप लागून गेला का सगळ्यांचा, तुलाच खूप अक्कल आहे, सरकारला अक्कल नाही का ?असा सवाल विचारत जरांगेंनी भुजबळांवर जोरदार निशाणा साधला.  हे ( भुजबळ) बिनडोक आहेत, त्यांनी (सरकारने) त्याला सोडवून आणलं. आणि आज तेच भुजबळ सरकारसाठी प्रचंड मोठी डोकेदुखी ठरत आहेत, असंही जरांगे म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...