AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाला आजवरचा सर्वात मोठा धक्का… शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी, निवडणूक अधिकाऱ्यांची धाड; मोठी खळबळ

Shahajibapu Patil News : शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर पडलेल्या धाडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शहाजी बापू यांनी गंभीर आरोप भाजपावर केले होते.

शिंदे गटाला आजवरचा सर्वात मोठा धक्का... शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी, निवडणूक अधिकाऱ्यांची धाड; मोठी खळबळ
Shahaji Bapu patil and Eknath Shinde
| Updated on: Dec 01, 2025 | 11:07 AM
Share

सांगोल्यात शहाजी बापूं पाटील यांच्या कार्यालयावर धाड पडली. LCB आणि निवडणूक आयोगाच्या पथवाकडून यावेळी रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आली. शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडल्याने एकच खळबळ उडाली. यावर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. हेच नाही तर काल रात्री सांगोल्यामधील आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाली असल्याचा गंभीर आरोप शहाजी बापू पाटील यांनी केला. सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला आपला पराजय दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे, असे थेट शहाजी बापू यांनी म्हटले.

शहाजी बापू यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर 

हेच नाही तर कारवाईनंतर शहाजी बापू यांना अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही सगळी माहिती देणार असल्याचे त्यांनी म्हटले. शहाजी बापू यांच्या कार्यालयावर धाड पडल्याच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, सत्तेत आहे की, बाहेरून आहे यावर धाड ठरत नसते. माझीही गाडी तपासली जाते.

शहाजी बापू यांना अश्रू झाले अनावर

त्यामुळे यामध्ये काही सत्ताधारी आणि विरोधक अशा गोष्टी नसतात. तक्रारी आल्यानंतर आमच्याही कार्यकर्त्यांकडेही तपासणी झाल्या आहेत. LCB आणि निवडणूक आयोगाच्या पथवाकडून शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडल्यानंतर त्यांनी थेट भाजपावरच निशाणा साधला. यापूर्वी आपण निवडणुकीवेळी भाजपाला कायमच मदत केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

शहाजी बापू यांच्या कार्यालयावर मोठी धाड

आता शहाजी बापूं यांच्या कार्यालयावर पडलेल्या धाडीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देत स्पष्टपणे म्हटले की, धाड पडताना सत्ताधारी किंवा विरोधक बघितले जात नाही. तक्रारी आल्यानंतर ही कारवाई केली जाते. धाड पडल्यानंतर शहाजी बापूं यांनी गंभीर आरोप करत भाजपाकडे बोट दाखवले होते.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.