AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Uddhav Thackeray : भोंगे वाजवणारे आणि कबरीवर जाणाऱ्यांना सुपाऱ्या दिल्या आहेत, उद्धव ठाकरेंचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती नाही का की महाराष्ट्रात विरोधी पक्ष त्यांचा भाजप आहे. भाजप इथे कुणाला तरी सुपारी देतोय ते. त्यानंतर मग भोंगे आठवतात, हनुमान चालिसा आठवते असा घणाघात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

CM Uddhav Thackeray : भोंगे वाजवणारे आणि कबरीवर जाणाऱ्यांना सुपाऱ्या दिल्या आहेत, उद्धव ठाकरेंचा घणाघात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेImage Credit source: tv9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Jun 08, 2022 | 9:28 PM
Share

औरंगाबाद : राज्यात मशिदीवर असलेल्या भोंग्यावरून (Bhonge)होणाऱ्या आजानचा मुद्दा उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी राण उठवून दिलं होतं. तसेच राज ठाकरे यांनी यामुद्द्यावरू शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच जर दिवसाही आजान ही आवाजाच्या मर्यादेपेक्षा वाजली तर मग हनुमान चालिसा लावू असे म्हटलं होतं. त्यानंतर खासदार नवनित राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान करत त्यांच्या घरासमोर जाऊन भोंग्यावरून हनुमान चालिसा म्हणू असा इशारा दिला होता. तर औरंगाबमध्ये ओवैसी संधू येऊन औरंगजेबच्या कबरीवर डोकं ठेवून गेले होते. त्यावरूनही राजकारण झाले होते. तेंव्हा प्रशासनाने कबरीवर सुरक्षा पुरवली होती. त्यावरूनही ठाकरेंवर निशाणा साधला होता. यासर्वांवर आता मुख्यमंत्री ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सडेतोड उत्तर देताना भाजपवर आज निशाणा साधला आहे. तसेच AIMIM ला आणि भोंगे वाजवणाऱ्यांना कोण सुपाऱ्या दिल्या असा सवाल केला आहे.

मध्यंतरी राज्यात भोंग्यावरून आणि हनुमान चालिसावरून ठाकरे सरकारला घेरण्यात आले होते. तसेच औरंगजेबच्या कबरीवरूनही टार्गेट केले गेले होते. तर हेच का तुमचे हिंदित्व का असा खोचक सवाल करण्यात आला होता. हा सवाल मनसे तसेच भाजपकडून वेळोवेळो केला जात होता. त्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार आणि कडक शब्दात उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी हे सर्व करणाऱ्यांना कोण सुपाऱ्या दिल्या असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदींना हे माहित नाही का

तसेच आपल्या देशात विरोधी पक्ष मूळ मुद्द्यांना बगल देऊन वेगळ्याच मुद्द्यावर बोलतोय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याचे सांगितलं. तसेच ते म्हणाले की, हो पंतप्रधान हे बरोबर सांगत आहेत. पण त्यांना माहिती नाही का की महाराष्ट्रात विरोधी पक्ष त्यांचा भाजप आहे. भाजप इथे कुणाला तरी सुपारी देतोय ते. त्यानंतर मग भोंगे आठवतात, हनुमान चालिसा आठवते असा घणाघात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

तसेच बाबरीवरून भाजपला सुनावताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बाबरीच्या जागेवर मंदिर बांधायचं धाडस तुम्ही केलं नाही. कोर्टातून आदेश आल्यानंतर तुम्ही जनतेसमोर झोळ्या पसरवल्या. मग तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपचे जे बेलगामपणे सुटलेले प्रवक्ते आहेत त्यांच्यावर लगाम घालावा. तुम्ही आमच्यावर वेडीवाकडी टीका केली तर आमचाही संयम सुटेल. तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर मिळेल. हा भगवा फडकवायला बरा म्हणून घेतलेला नाही. हा वारकऱ्यांचा, छत्रपतींचा, हिंतुत्वाचा भगवा आहे. इकडे हनुमान चालिसा बोलायची आणि तिकडे जाऊन शिव्या द्यायच्या हे बरोबर नाही.

मित्र हा हाडवैरी बनला

तसेच भाजपच्या सरकार पडणार यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, रोज ज्यांच्या स्वप्नात उद्या सरकार पडणार, परवा सरकार पडणार असं वाटत होतं. पुन्हा येणार म्हणत होते. त्यांना कळलंही नाही की या महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे कधी पुर्ण झाली. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत इतके दिवस ज्यांच्याविरोधात आपण लढत होतो त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन राज्याचा विकास करण्यासाठी मदत केली. मात्र मित्र हा हाडवैरी बनल्याचा त्यांनी सांगितले.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...