सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीने बालविवाह रोखला, पोलिस दिसताच वऱ्हाडींनी पळ काढला

सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्या मदतीने बीड जिल्ह्यातला बालविवाह रोकला गेला.

सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीने बालविवाह रोखला, पोलिस दिसताच वऱ्हाडींनी पळ काढला
सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीने बालविवाह रोकला...

बीड : माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील एका अल्पवयीन मुलीचे धारुर तालुक्यातील कारी येथील मुलासोबत काल गुरुवार दि. 18 रोजी विवाह लावला जाणार होता. माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या व दिंद्रुड पोलिस आल्याचे पाहताच विवाह स्थळावरून वऱ्हाडी मंडळी पळून गेल्याने हा बालविवाह रोकण्यात यश आले.  (Child marriage held in beed Was Stoped help of Social Activist And police)

beed Child Marriage

हिवरा गावातील १६ वर्षीय मुलीचा विवाह कारी येथील मुला सोबत गुरुवारी कारी येथे आयोजित करण्यात आला होता. हळदीचा मांडव व विवाह समयीचे सर्व सोपस्कार पुर्ण करण्यासाठी दोन्ही परिवरातील मंडळी कामाला लागली मात्र माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल व दिंद्रुड पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश विदाटे विवाह स्थळावर पोहोचले. यामुळे वऱ्हाडी मंडळीसह सर्वांची धावपळ झाली.

beed Child Marriage

हा विवाह समारंभ नसून साखरपुडा कार्यक्रम असल्याचा बनाव मुलीच्या घरच्यांनी केला. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे वऱ्हाडी मंडळीने काढता पाय घेत विवाहसोहळा रद्द केला.

दरम्यान, ग्रामीण भागांतल्या अनेक बालविवाह प्रकरणांमध्ये पोलिस कारवाई करण्याऐवजी पालकांना विविध आयडिया देत असल्याने बाल विवाहाला प्रोत्साहन मिळत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी व्यक्त केली आहे.

(Child marriage held in beed Was Stoped help of Social Activist And police)

हे ही वाचा :

मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची पुनर्रचना, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंचा पहिला निर्णय

मुख्यमंत्री नाशिक-नंदुरबार दौऱ्यावर, सातपुडा डोंगररांगांतील आरोग्य केंद्रांची पाहणी करणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI