वाशी ते कामोठे…मुंबईत सिडकोची घरे कुठे-कुठे स्वस्त; 2 महिन्यांत लॉटरीही निघणार, मोठी अपडेट समोर!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. सिडकोची घरे दहा टक्क्यांनी कमी होणार आहेत. कोणकोणत्या भागातील घरांची किंमत कमी होईल, याचीही शिंदे यांनी माहिती दिली आहे.

CIDCO House Lottery : नागपुरात सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता सीडकोची घरे दहा टक्क्यांनी स्वस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे आता सिडकोची चांगलीच स्वस्त होणार आहेत. विशेष म्हणजे आगामी दोन महिन्यात सिडकोच्या तब्बल 17 हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा हजारो लोकांना होणार आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी नेमकं कोण-कोणत्या भागात घरे स्वस्त होणार आहेत, याची माहिती शिंदे यांनी सभागृहात दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
कोणकोणत्या भागातील घरे होणार स्वस्त?
एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतर्फे नवी मुंबई भागात काही ठिकाणी घरांची निर्मिती करण्यात आली आहे. ही घरने खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या परिसरात आहेत. या घरांची संख्या तब्बल 17 हजार एवढी आहे. त्यामुळे या सर्वच घरांची किंमत आता नव्या निर्णयानुसार 10 टक्क्यांनी कमी होणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार या 17 हजार घरांची लॉटरीची प्रक्रिया आगामी दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे. शिंदे यांनी जाहीर केलेला हा निर्णय इडब्ल्यूएस आणि एलआयजी प्रवर्गातील घरांसाठी लागू राहील.
दोन महिन्यांत लॉटरी निघणार, कागदपत्रे ठेवा रेडी
दरम्यान, नवी मुंबई हा परिसर मोठ्या वेगाने विकसित होत आहे. सिडकोची ही सर्व घरे नवी मुंबई परिसरातच असणार आहेत. त्यामुळे लॉटरी प्रक्रियेत सहभागी होऊन थेट मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची ही नामी संधी असल्याचे बोलले जात आहे. सिडकोची ही लॉटरी आगामी दोन महिन्यांत सिडकोच्या घरांची लॉटरी निघणार आहे. त्यामुळे आतापासूनच लॉटरी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
