AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्यावर गोळीबार करण्यात आला, लाठ्या काठ्या बरसल्या; फडणवीसांनी सांगितला रामजन्म भूमी आंदोलनाचा अनुभव

राहुल गांधी यांच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात तरुणांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना रामजन्म भूमी आंदोलनाचा अनुभव सांगितला.

माझ्यावर गोळीबार करण्यात आला, लाठ्या काठ्या बरसल्या; फडणवीसांनी सांगितला रामजन्म भूमी आंदोलनाचा अनुभव
devendra fadnavis Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 23, 2026 | 12:42 PM
Share

राहुल गांधी यांनी पुण्यात विद्यार्थिनींशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीही नागपुरात जेन-झींशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिल्या. त्यांनी रामजन्म भूमी आंदोलनाचेही अनेक किस्से सांगितले. अयोध्यामध्ये पहिल्यांदा गोळीबार पाहिल्याचेही त्यांनी नमूद केले. आंदोलन हिंसक झाल्यानंतर आमच्यावर गोळीबार झाला होता, असा कटु अनुभव देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी ज्या प्रकारे राजकारणात आलो. हा माझा व्यवसाय नाही. ही माझी मिशन आहे. माझा विश्वास आहे की, राजकारण हे साधन आहे की, ज्यामुळे सामिजक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणले जाते. मी 18 वर्षांचा होतो. विद्यार्थी परिषदेने एक निश्चय केला होता. ज्यावेळी श्रीनगरमधील लालचौकावर भारताचा झेंडा फडकत नव्हता. त्यानंतर लालचौकावर झेंडा फडकवण्याचं ठरवलं. मी अवघ्या 18 वर्षांचा होतो. माझ्यासोबत काही जण 16 , काही 17 वर्षांचे होते. असे एकूण 10 हजार जण होते. आम्ही सर्व जम्मूला गेलो. नंतर उधमपूरला गेलो. तिकडे आम्हाला सैन्यांनी रोखल्यानंतर आम्ही चालत श्रीनगरला गेलो. त्यावेळी सैन्याने पुन्हा थांबवलं.

‘आम्हाला ताब्यात घेऊन दिल्लीत आणलं. नंतर प्रधानमंत्र्यांच्या घराला घेराव घातला. आम्हाला लालचौकावर झेंडा लावण्यास दिला नाही, तर तुम्ही जाऊन लावा, असे आम्ही त्यांना सांगितलं. परंतु त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान झेंडा लावू शकले नाहीत. 1992 मध्ये मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लालचौकात झेंडा फडकावला, असेही फडणवीसांनी सांगितले.

‘मी 20 वर्षांचा असताना प्रयागराजला गेलो. तिथून अयोध्येला गेलो. पहिल्यांदा गोळीबार बघितला. आमच्यावर गोळीबार झाला. लाठीचार्ज झाला. आम्हाला ताब्यात घेतलं. त्यानंतर 18 दिवस सेंट्रल जेलमध्ये होतो. बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच आंदोलनात गेलो. 92 साली बाबरीचा ढाचा पाडण्यात आला, त्यावेळी मी तिथे होतो. त्याचा मला अभिमान आहे,असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्टार्टअप्सवरही भाष्य केलं. त्याच्यासाठी वेगळा फंड तयार केल्याचेही सांगितले. स्टार्ट्सअपला राज्य सरकार मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?