CM Uddhav Thackeray : 14 एप्रिलपासून राज्यभर संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

CM Uddhav Thackeray : 14 एप्रिलपासून राज्यभर संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
Chief Minister Uddhav Thackeray

बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यभर संचारबंदी लागू असणार आहे, अशी घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या. त्याच्या या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 13, 2021 | 10:02 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना राज्यातील कोरोनाची माहिती देताना उपाययोजनांचेही तपशील सांगितले. तसेच बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यभर संचारबंदी लागू असणार आहे, अशी घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या. त्याच्या या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे (CM Uddhav Thackeray PC on Maharashtra Lockdown and Corona 10 important points).

1. सर्व दुर्बल घटकांना दिलासा

आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.

2. एक महिना मोफत अन्नधान्य

अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल.

3. शिवभोजन थाळी मोफत

राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे.

4. निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य

या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे 35 लाख लाभार्थ्यांना 2 महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल.

5. बांधकाम कामगारांना अनुदान

नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील 25 लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

6. फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य

राज्यातील सुमारे 5 लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेरीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

7. रिक्षाचालक

राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी 1500 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.

8. आदिवासी कुटुंबांना सहाय्य

आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे 12 लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येईल.

9. कोविडवरील सुविधा उभारणी

याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे 3 हजार 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल.

10.सरकारी संस्थांना कर भरण्यास मुदतवाढ

याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

घरेलू कामगारांपासून ते रिक्षा चालकांपर्यंत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बघा कुणाला किती पैसा मिळणार?

1. राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी प्रत्येकी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देणार आहोत. या योजनेमध्ये सात कोटी नागरिकांचा समावेश आहे. दहा रुपयांची शिवभोजन थाळी पाच रुपयांवर आणली होती. पुढचे काही दिवस शिवभोजन थाळी मोफत देणार आहोत.

2. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना अशा पाच योजनेतील लाभार्थ्यांना 1 हजार रुपये आगाऊ देणार आहोत. यामध्ये 35 लाख लोकांचा समावेश आहे.

3. महाराष्ट्र राज्य इमारत कामगार कल्याण मंडळ आहे. त्यात 12 लाख लाभार्थी आहेत. त्यांना 1500 रुपये देणार आहोत.

4. नोंदणीकृत घरेलू कामगारांनाही आर्थिक मदत करणार.

5. अधिकृत फेरीवाले यांना प्रत्येकी 1500 रुपये देत आहोत. यांची संख्या 5 लाख आहे.

6. रिक्षा चालकांना 1500 रुपये देत आहोत. यांची संख्या 15 लाख आहे.

7. आदिवासी समाजातील खावटी योजनेच्या लाभार्थी आदिवासी कुटुंबाना प्रत्येकी 2000 रुपये देत आहोत. त्यांची संख्या 12 लाख आहे.

8. कोविड संदर्भातील उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी 3300 कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत.

9. हे सगळ करण्यासाठी 5 हजार 400 कोटी रुपये निधी बाजूला काढून ठेवत आहे.

हेही वाचा :

Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown Highlights : राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी

राज्यात कलम 144 लागू, पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra lockdown Update : उद्यापासून 15 दिवस महाराष्ट्रात संचारबंदी, काय सुरु, काय बंद राहणार?

व्हिडीओ पाहा :

CM Uddhav Thackeray PC on Maharashtra Lockdown and Corona 10 important points

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें